डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

French Open Tennis : स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि इटलीच्या जेन्निक सिन्नर यांच्यात विजेतेपदासाठी सामना

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि  इटालियन खेळाडू जेन्निक सिन्नर यांचा  सामना होईल. जेन्निक सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर अल्काराझ फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा गतविजेता आहे.  सामना संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होईल.

 

उपांत्य फेरीत सिनरनं नोवाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव केला तर अल्काराझविरुद्ध लोरेन्झो मुसेट्टीनं पायाच्या दुखापतीमुळं सामन्यातून माघार घेतली होती.

 

महिला एकेरीत, अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफनं काल रात्री झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अरिना सबालेंकाचा ६-७, ६-२, ६-४ असा पराभव केला. २०१८ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेनंतर जागतिक क्रमवारीतल्या अव्वल दोन महिला ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत आमनेसामने आल्याची ही पहिलीच वेळ आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गॉफचे हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आणि मातीच्या मैदानावरचा हा तिचा पहिला मोठा विजय आहे. या विजयानंतर कोको गॉफ फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन या दोन्ही स्पर्धांची एकेरी विजेतेपदं जिंकणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. २००२ मध्ये सेरेना विल्यम्सने ही कामगिरी केली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा