May 31, 2025 5:46 PM May 31, 2025 5:46 PM

views 13

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी वॉशिंगटनमध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. अमेरिकेचे उप-परराष्ट्र सचिव क्रिस्टोफर लँडौ यांच्यासोबत त्यांनी दोन्ही बाजूंच्या द्विपक्षीय मुद्द्याचा आढावा घेतला. अमेरिकेचे संरक्षण उप-सचिव स्टीव्ह फेनबर्ग आणि धोरणविषयक विभागाचे उप-सचिव एल्ब्रिज कोल्बी यांच्यासोबतच्या बैठकींमध्ये दोन्ही देशांनी मजबूत आणि दूरदर्शी संरक्षण भागीदारीसाठी वचनबद्धता व्यक्त केली. परराष्ट्र सचिव मिसरी यांनी ट्रेझरी उप-सचिव मायकल फॉकेंडर यांच्यासोबत आर्थिक संबंध वाढवण्यावर...

May 28, 2025 2:31 PM May 28, 2025 2:31 PM

views 8

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी घेतली अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची भेट

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची वॉशिंग्टन इथं आज भेट घेतली. दोन्ही देशात महत्त्वाच्या तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोघांमधे चर्चा झाली. भारत आणि अमेरिका यांच्यातले व्यापार संबंध अधिक दृस व्हावेत यासाठी भारत-अमेरिका धोरणात्मक व्यापार संवाद करण्याबाबतही दोघांमधे चर्चा झाली. विक्रम मिसरी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून ते ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

May 20, 2025 12:59 PM May 20, 2025 12:59 PM

views 13

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री संसद सदस्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात माहिती देणार

भारतातर्फे सर्वपक्षीय संसद सदस्यांची शिष्टमंडळं विविध देशांना भेट देऊन देशाची बाजू मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आज संसदेत संसद सदस्यांना ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देणार आहेत. असे सात शिष्टमंडळं विविध देशात जाणार आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळाचे सदस्य पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती देणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ही शिष्टमंडळं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या सदस्य देशांनाही भेटणार आहेत.

May 20, 2025 9:42 AM May 20, 2025 9:42 AM

views 16

परराष्ट्र धोरणाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती

भारत-पाकिस्तान दरम्यान सध्याच्या परराष्ट्र धोरणाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. संसदीय समितीसमवेत झालेल्या बैठकीनंतर थरुर यांनी यासंबंधीची माहिती वार्ताहर परिषदेत दिली. परराष्ट्र धोरण विकासाविषयी संसदीय स्थायी समितीला वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं माहिती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचंही थरुर यांनी नमूद केलं.

October 21, 2024 8:54 PM October 21, 2024 8:54 PM

views 15

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार

लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे २०२०मध्ये सुरू झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळू शकतो, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असंही ते म्हणाले. तसंच, रशियन सैन्यात लढलेल्या भारतीयांच्या परत येण्याविषयीही मिस्री यांनी माहिती दिली. रशियातून ८५ भारतीय मायदेशी परतले आहेत आणि जवळपास २० जण अजूनही तिथेच...

July 19, 2024 2:54 PM July 19, 2024 2:54 PM

views 17

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आजपासून भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यात ते भूतानच्या राजाची भेट घेतील. त्यानंतर ते भूतानचे प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांची भेट घेतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.