परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची वॉशिंग्टन इथं आज भेट घेतली. दोन्ही देशात महत्त्वाच्या तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोघांमधे चर्चा झाली. भारत आणि अमेरिका यांच्यातले व्यापार संबंध अधिक दृस व्हावेत यासाठी भारत-अमेरिका धोरणात्मक व्यापार संवाद करण्याबाबतही दोघांमधे चर्चा झाली. विक्रम मिसरी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून ते ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
Site Admin | May 28, 2025 2:31 PM | Foreign Secretary Vikram Misri
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी घेतली अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची भेट
