September 26, 2025 9:59 AM September 26, 2025 9:59 AM

views 17

ग्राहकाभिमुख सेवा देण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बँकांना आवाहन

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पुण्यात केलं. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एक्काणवाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बँकांनी ग्राहकाभिमुख सेवा द्यावी; तसंच तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं असल्याचं सीतारामन म्हणाल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी लघु उद्योगांसाठी युवकांना कर्ज आणि इतर सेवा द्याव्यात, असंही त्यांनी सुचवलं. सीतारामन यांनी बँक ऑफ ...

September 17, 2025 3:28 PM September 17, 2025 3:28 PM

views 19

नव्या जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल- अर्थमंत्री

 नव्या जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं जीएसटी सुधारणांबाबत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.   या सुधारणांमुळे कर भरण्यात खर्च होणाऱ्या सामान्य लोकांच्या पैशांची बचत होईल, असंही त्या म्हणाल्या. नव्या सुधारणांमुळे २०२५ या वर्षात जीएसटी संकलनात वाढ होऊन ते  २२ लाख कोटी रुपयांहून अधिक असेल, असं त्यांनी सांगितलं.   या सुधारणांमुळे कृषी संबंधी वस्तूंवरचा कर ...

August 23, 2025 12:37 PM August 23, 2025 12:37 PM

views 16

५६वी जीएसटी परिषद येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार

जीएसटी परिषदेची ५६वी बैठक येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.   जीएसटीमधला १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात यासंबंधीचे संकेत दिले होते.

July 6, 2025 1:10 PM July 6, 2025 1:10 PM

views 5

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठक संपन्न

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल रिओ दी जानेरो इथं ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठका घेऊन धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रातला सहयोग वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्याच्या इतर मुद्द्यावर चर्चा केली. ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, सीतारमण यांनी रशियाचे अर्थमंत्री अँटॉन सिलुआनोव्ह यांच्याशी आर्थिक क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल, तसंच न्यू डेव्हलपमेंट बँक या विषयावर संवाद साधला. चीनचे अर्थमंत्री लान फोआन य...

June 30, 2025 1:36 PM June 30, 2025 1:36 PM

views 21

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या ५ जुलैपर्यंत हा दौरा नियोजित आहे. स्पेन दौऱ्यात त्या संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या विकासासाठी वित्तपुरवठा या विषयावरच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील आणि निवेदन देतील.   या परिषदेत विविधी मुद्द्यांवर चर्चा होणार असून शाश्वत विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतल्या सुधारणा यांचा त्यात समावेश असेल. त्यानंतर सेव्हील इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय...

June 27, 2025 1:59 PM June 27, 2025 1:59 PM

views 20

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यतेखाली बैठक पार

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.  

June 12, 2025 1:25 PM June 12, 2025 1:25 PM

views 15

डीबीटी व्यवहारांमधे गेल्या दशकात नव्वद पटीनं वाढ- अर्थमंत्री

डीबीटी व्यवहारांमधे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात नव्वद पटीनं वाढ झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. २०१४ डीबीटी व्यवहारांमधे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात नव्वद पट वाढ मध्ये ७ हजार कोटीहून अधिक असलेली डीबीटीची संख्या गेल्या आर्थिक वर्षात ६ लाख कोटीहून अधिक झाल्याचं अर्थमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या संदेशात म्हटलं आहे.   २०२४ -२५ या वर्षात २६० लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार करत भारतानं  रिअल टाईम पेमेंटमध्ये जगात आघाडी घेतली असल्याचं त्यांनी आणखी ए...

May 10, 2025 10:42 AM May 10, 2025 10:42 AM

views 20

बँकिंग सेवा अविरत सुरू राहाव्यात म्हणून सावध राहण्याचे बँकांना निर्देश- निर्मला सीतारामन

बँकिंग आणि वित्तीय सेवा अखंड आणि अविरत सुरू राहाव्यात म्हणून कोणत्याही संकटाला किंवा परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सावध आणि सज्ज राहण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व बँकांना दिले आहेत.   सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत,आव्हानात्मक काळात आर्थिक स्थिरता निश्चित करण्यात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर द...

April 12, 2025 1:12 PM April 12, 2025 1:12 PM

views 10

ऑस्ट्रियाबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारत प्रयत्नशील – केंद्रीय अर्थमंत्री

ऑस्ट्रियाबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या बाजूने  भरीव योगदान देण्यासाठी भारत सरकार सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथं भारतीय समुदायाशी संवाद साधत होत्या.   ऑस्ट्रियाच्या विकासात  भारतीय उद्योजकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रियामध्ये स्टार्ट अप्स, अर्थ तंत्रज्ञान, हरित  तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक भागीदारी वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या उद्योजकांमध्ये उ...

March 28, 2025 10:36 AM March 28, 2025 10:36 AM

views 11

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक 2025 लोकसभेत मंजूर

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक, 2025 काल लोकसभेत संमत करण्यात आलं. स्थलांतरविषयक कायद्यांचं आधुनिकीकरण करणं आणि पारपत्रं, प्रवासविषयक दस्तऐवज, व्हिसा आणि नोंदणी यासंदर्भात केंद्र सरकारला काही विशिष्ट अधिकार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना देताना गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.   भारत हा भू-राजकीय नव्हे तर भू-सांस्कृतिक देश आहे. स्थलांतरितांचं स्वागत करून...