डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बँकिंग सेवा अविरत सुरू राहाव्यात म्हणून सावध राहण्याचे बँकांना निर्देश- निर्मला सीतारामन

बँकिंग आणि वित्तीय सेवा अखंड आणि अविरत सुरू राहाव्यात म्हणून कोणत्याही संकटाला किंवा परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सावध आणि सज्ज राहण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व बँकांना दिले आहेत.

 

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत,आव्हानात्मक काळात आर्थिक स्थिरता निश्चित करण्यात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा