September 3, 2024 3:18 PM September 3, 2024 3:18 PM
31
आंध्रप्रदेशात पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू
आंध्रप्रदेशात एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या पूरग्रस्त भागात मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद संस्था हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल रात्री राज्यातल्या पुरस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, विजयवाडा आणि हैदराबादला जोडणाऱ्...