January 31, 2025 3:42 PM

views 16

T20 क्रिकेट : पुण्यात भारत आणि इंग्लड यांच्यात मालिकेतला चौथा सामना

भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत याआधी झालेल्या तीन सामन्यांपैकी भारतानं दोन तर इंग्लंडनं एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा, तर बरोबरी साधण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना येत्या २ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.

January 29, 2025 10:27 AM

views 13

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव

भारत आणि इंग्लंड यांच्यात काल राजकोट इथल्या निरंजन शाह मैदानावर झालेल्या तिसऱ्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडनं दिलेल्या 172 धावांचं उद्दिष्ट गाठताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 145 धावा केल्या. या पराभवानंतरही, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-1 नं आघाडीवर आहे. मालिकेतला चौथा सामना शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.

January 22, 2025 8:28 PM

views 12

इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यात ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या १४ व्या षटकात ६ बाद ९७ धावा झाल्या होत्या.  सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर अर्शदीप सिंगनं फिल सॉल्टला शून्यावर तंबूत धाडलं. तर तिसऱ्या षटकात त्यानं बेन डकेटला ४ धावांवर बाद केलं. त्यानंतर कर्णधार जोस बटलरनं इंग्लंडचा डाव सावरला. भारतीय संघाचं नेतृत्व ...

January 12, 2025 2:52 PM

views 22

इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. सुर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल. मोहम्मद शमी एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय क्रिकेट संघात परतत आहे.   संघातल्या इतर खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. मालिकेतील पहिला सामना २२ ज...

December 7, 2024 7:31 PM

views 17

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५ लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड जगातला पहिला संघ ठरला

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड हा जगातला पहिला संघ ठरला आहे. एकूण १ हजार ८२ सामने खेळून आणि ७१७ खेळाडूंच्या  सहभागातून इंग्लंडने हा विक्रम नोंदवला आहे.    इंग्लंड संघाने १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा संघही इंग्लंड आहे.    कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलिया संघाचा तर भारतीय संघाचा तिसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया संघाच्या ४ लाख, ...

August 4, 2024 2:02 PM

views 32

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यातल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना केली आहे. अनेक विमान कंपन्यानी लेबनाॅन मधल्या हवाई सेवा रद्द केल्या असल्या तरी अद्याप काही विमानसेवा उपलब्ध आहेत असं लेबनाॅन मधल्या अमेरिकी दूतावासानं सांगितलं आहे. दरम्यान स्वीडननं सर्वात आधी बेरुट मधला दूतावास बंद केला आहे.