August 29, 2025 1:34 PM

views 12

बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेत तीन लाख लोकांना नोटीसा

बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेत सुमारे तीन लाख लोकांना संशयास्पद नागरिकत्वावरून नोटीसा बजावल्या आहेत. या मतदार याद्या पुनरिक्षणात या लोकांनी त्यांची ग्राह्य कागदपत्रं जमा केलेली नाहीत.   या लोकांचा अधिक तपास केला असता त्यांचं नागरिकत्व संशयास्पद आढळून आलं असून त्यापैकी बहुतांश जण बांगलादेश व नेपाळचे नागरिक आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, नोटीस दिलेले बहुतांश नागरिक हे पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि सुपौल या...

August 26, 2025 1:11 PM

views 21

बिहारमधे 99.11 शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्रं जमा

बिहारमधे मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणादरम्यान 99 पूर्णांक 11 शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्रं मिळाली असून दावे, हरकती आणि कागदपत्र दाखल करण्यासाठी अद्याप सात दिवस शिल्लक आहेत, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.   बूथ पातळीवरचे अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं राबविण्यात येणारी संकलन निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

August 23, 2025 8:15 PM

views 63

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली. २९ महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.    बृहन्मुंबई महानगरपालिकेत यात निवडणुकीसाठी २२७ प्रभाग असतील. नवी मुंबई महानगरपालिकेत २८ प्रभाग असून यात २७ प्रभाग चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहे, यातून १११ सदस्य निवडले जाणार आहेत.  नागपूर मधे एकूण ३८ प्रभाग असतील. यात चार सदस्यीय प्रभाग ३७ तर एक प्रभाग तीन सदस्यीय असेल.   नागपूर महानगरपालिकेत १५१ नगरसेवक निव...

June 5, 2025 6:41 PM

views 20

निवडणुका संपल्यानंतर बिनचूक अहवाल तयार करण्यासाठी इंडेक्स कार्ड प्रणाली सुरू

  केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुका संपल्यानंतर तयार होणारे विविध आकडेवारी विषयक अहवाल जलदगतीनं तयार करण्यासाठी इंडेक्स कार्ड ही एक नवी तंत्रज्ञानाधारित प्रणाली सुरू केली आहे. इंडेक्स कार्ड ही निवडणूक आयोगाची स्वतःची मात्र कायद्यानं बंधनकारक नसलेली माहिती प्रणाली असेल. या माध्यमातून निवडणुकांनंतरची महत्त्वाची आकडेवारी संकलित केली जाईल. संशोधक, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिकांना मतदारसंघनिहाय माहिती सुलभतेनं उपलब्ध व्हावी हा यामागचा हेतू असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. &nb...

February 23, 2025 1:47 PM

views 10

जर्मनीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

जर्मनीत आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज यांचं सरकार कोसळल्यामुळे ही निवडणूक  होत आहे. या निवडणुकीत ओलाफ शोल्ज आणि फ्रेडरिक मर्झ यांच्या आघाड्यांमधे चुरशीची लढत आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं आणि युरोपमधे देशाला महत्वाचं स्थान मिळवून देण्याचं आश्वासन मर्झ यांनी दिलं आहे. तर देशातल्या अति उजव्या शक्तिंविरुद्ध केवळ आपणच लढू शकतो, असं शोल्ज यांनी म्हटलं आहे.

February 16, 2025 8:16 PM

views 11

गुजरातमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान

गुजरातमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण ५ हजार ८४ उमेदवार लढत आहेत. त्यापैकी आज २ हजार ८ जागांसाठी मतदान झालं. याखेरीज १७० जागा आधीच बिनविरोध घोषित करण्यात आल्या आहेत.   आज सर्वत्र शांततेत मतदान झालं. मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था देखील केली होती. निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १० हजारांहून अधिक पोल...

February 15, 2025 3:42 PM

views 15

नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा इतिहास

विधानसभा निवडणुकीत १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून देत नाशिक जिल्ह्यानं इतिहास रचला असून याची दखल घेत नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत बोलत होते.   नाशिकच्या विकासासाठी ‘नार- पार- गिरणा’ हा सुमारे सात हजार कोटी रुपयांचा नदी जोड प्रकल्प मंजूर केल्याचं शिंदे यांनी सांगितलं. विरोधकांनी आपल्यावर टीका करण्यापेक्षा आपल्यासारखं सकारात्मक काम करून दाखवावं असं आवाहन शिंदे यांनी केलं.

January 11, 2025 10:55 AM

views 10

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना काल जारी झाल्याच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानीतल्या ७० जागांसाठी येत्या १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.   या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल संध्याकाळी दिल्ली पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह तसंच अन्य महत्त्वाचे पक्षनेते उपस्थित होते.

November 10, 2024 1:49 PM

views 15

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि  इंडिया या दोन्ही आघाड्यांचे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बोकारो इथं सभा घेत असून गढवा  इथंही त्यांची प्रचारसभा होणार आहे, तर रांची मधे ते रोड शो करणार आहेत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान प्रत्येकी तीन सभा घेणार आहेत, तर भाज...

November 7, 2024 10:38 AM

views 13

महाराष्ट्रात विविध कारवाईंमध्ये 280 कोटी रुपयांचा माल जप्त

विधानसभा निवडणुका, तसंच पोटनिवडणुका सुरू असलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि इतर राज्यांमधून निवडणूक आयोगाच्या संस्थांनी आत्तापर्यंत पाचशे 58 कोटी रुपयांची रोकड, मद्य, वाटपाच्या वस्तू, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. महाराष्ट्रात विविध कारवाईंमध्ये 280 कोटी रुपयांचा, तर झारखंडमध्ये 158 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.   महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम तिप्पट असल्याचं निवडणूक आयोगानं नमूद केलं आह...