September 30, 2025 9:11 PM September 30, 2025 9:11 PM

views 73

बिहारमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, साडे २१ लाख मतदारांची वाढ

बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या नंतर विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. मसुदा मतदार यादीच्या तुलनेत या यादीत २१ लाख ५३ हजार मतदार वाढले आहेत तर ३ लाख ६६ हजार मतदार कमी झाले आहेत.    २४ जून २००५ रोजी ७ कोटी ८९ लाख मतदार बिहारमध्ये होते. त्यातले ६५ लाख मसुदा यादीत वगळले गेले, त्यानंतर ७ कोटी २४ लाख मतदार यादीत होते. आज प्रसिद्ध झालेल्या यादीत ७ कोटी ४२ लाख मतदार आहेत.

September 29, 2025 9:26 AM September 29, 2025 9:26 AM

views 36

EC: आगामी निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक तैनात

भारतीय निवडणूक आयोगानं बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यांमधील आठ विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक तैनात करण्याची घोषणा केली आहे. या निरीक्षकांमध्ये सामान्य नागरिक, पोलिस आणि खर्च निरीक्षकांचा समावेश असेल. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी 320 जिल्हाधिकारी आणि 60 पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह एकंदर 470 अधिकारी केंद्रीय निरीक्षक म्हणून तैनात केले जातील.

August 14, 2025 8:13 PM August 14, 2025 8:13 PM

views 5

बिहारमध्ये मतदारयाद्यांमधून वगळलेल्यांची नावं प्रसिद्ध करायचे निवडणूक आयोगाला आदेश

बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर मसुदा मतदारयाद्यांमधून वगळलेल्या ६५ लाख लोकांची नावं संकेतस्थळावर जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला दिले. ही नावं का वगळली, हेसुद्धा यात नमूद करावं, ओळखपत्र क्रमांकानुसार ही कागदपत्रं शोधता यायला हवीत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. ही यादी बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करायची आहे. तसंच अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी या व्यक्तींनी अर्ज केल्यानंतर पुरावा म्हणून आधार क...

August 11, 2025 2:52 PM August 11, 2025 2:52 PM

views 3

निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचा आरोप करुन, इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला.   बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. पोलिसांनी मोर्चा अडवला तेव्हा आंदोलनकर्त्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.   काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अखिलेश...

August 3, 2025 11:43 AM August 3, 2025 11:43 AM

views 129

भारत निवडणूक आयोगाने बीएलओ आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

भारत निवडणूक आयोगाने BLO म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच बीएलओ पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ERO अर्थात मतदार नोंदणी अधिकारी आणि AERO म्हणजेजान सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीचा भक्कम आधार आहे.   त्यामुळे मतदार यादी तयार करण्यासाठी तसंच तिच्या पुनरावलोकनासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याकरिता निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं आहे. या नव्या तरत...

July 23, 2025 2:29 PM July 23, 2025 2:29 PM

views 16

नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून प्रक्रीया सुरु

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी भारत निवडणूक आयोगानं निवडणुक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत घोषणेपूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या  मतदार संघांची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निवडीला अंतिम स्वरुप देणं तसंच यापूर्वीच्या सर्व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांशी संबंधित दस्तऐवज  तयार करून ते प्रसारित करण्याची कामं सुरु केली असल्याचं आयोगानं आप...

July 10, 2025 5:14 PM July 10, 2025 5:14 PM

views 16

बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची  परवानगी दिली आहे. न्यायचं हित लक्षात घेता, निवडणूक आयोगानं या प्रक्रिये दरम्यान आधार, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यासारखी महत्त्वाची ओळखपत्र स्वीकारण्याचा विचार करावा असं आपलं मत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. मतदार यादीचं पुनरिक्षण करणं, ही गोष्ट संविधानाच्या कक्षेत असली, तरी ही प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगानं साधलेली वेळ अनाकलनीय असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. विशेष पुनरिक्षण प्र...

June 27, 2025 10:54 AM June 27, 2025 10:54 AM

views 16

मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू

आवश्यक अटी पूर्ण न केल्याबद्दल देशातील 345 नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं सुरू केली आहे. 2019 पासून आतापर्यंत एकही लोकसभा, विधानसभा निवडणूक किंवा पोटनिवडणूक न लढलेल्या पक्षांची नोंदणी या प्रक्रियेत रद्द करण्यात येणार असून त्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटिस बाजावून त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

June 8, 2025 4:37 PM June 8, 2025 4:37 PM

views 19

राहुल गांधींनी निवडणुक आयोगाशी संवाद साधावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता, त्यावर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा हे आवाहन केलं. गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरूपात द्यावी, तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला १५ मे रोजी भेटीचं आमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांनी ह...

March 26, 2025 3:28 PM March 26, 2025 3:28 PM

views 34

निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन

निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रथमच प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांच्या हस्ते झालं. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडूमधल्या १३ जिलह्यांमधले निवडणूक नोंदणी अधिकारी आणि  निवडणूक अधिकारी यांच्यासह १०० हून जास्त बूथ पातळीवरचे अधिकारी या टप्प्यात प्रशिक्षण घेणार आहेत.