September 18, 2025 2:30 PM September 18, 2025 2:30 PM

views 23

ECI ची नवी दिल्लीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु

भारतीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीमध्ये मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीमधल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ पातळीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिल्ली मुख्य निवडणूक अधीकारी कार्यालयानं दिली.    नवी दिल्लीत २००२ साली राबवलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानंतर अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार याद्या दिल्ली सीईओच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या असून, नागरिका...

May 25, 2025 1:33 PM May 25, 2025 1:33 PM

views 26

पाच विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या मिळून पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. याविषयीची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पुढच्या महिन्यात २ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, ३ जून रोजी त्यांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून असून १९ जून रोजी मतदान तर २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे.    गुजरातमध्ये २, तर उर्वरित राज्यांमधल्या प्रत्येकी एका मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. 

May 24, 2025 3:55 PM May 24, 2025 3:55 PM

views 12

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा देणार – ECI

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. योसोबतच प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्यानं निश्चित केली असून, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आतमध्ये प्रचार करायला मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या  दिवशी मतदारांना अनौपचारिक ओळखपत्र देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत.

May 4, 2025 7:11 PM May 4, 2025 7:11 PM

views 13

भारत निवडणूक आयोग ‘ECINET’ मोबाईल अ‍ॅप लाँच करणार

भारत निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ‘ECINET’ हे मोबाईल अ‍ॅप लाँच करणार आहे.  आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध ४० मोबाईल आणि वेबसाईट अ‍ॅप्सचा समावेश या एकाच अ‍ॅपमध्ये असेल. या अ‍ॅपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात.   ECINETचा दर्शनीभाग हा दिसायला आकर्षक असेल तसंच वापरायला सोपा असेल. तसंच या अ‍ॅपमुळे विविध अ‍ॅप्स डाऊनलोड करून त्यात वेगवेगळं लॉग-इन करून मग माहिती संकलित करायचं जिकिरीचं का...

January 23, 2025 9:18 PM January 23, 2025 9:18 PM

views 15

धोरणात सकारात्मक बदल करण्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याचं आवाहन

चुकीची माहिती आणि सायबर सुरक्षा धोका यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या धोरणात सकारात्मक बदल करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक व्यवस्थापन संस्थांना केलं. भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. कार्यक्षमता, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि मतदारांचा विश्वसा जिंकण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची आहे, असं सांगत निवडणूक प्रक्रियेबाबत संशय उत्पन्न करणाऱ्या कथनांबाबत सावधगिरी बाळगायला हवी, असं राजीव कुम...

January 22, 2025 8:19 PM January 22, 2025 8:19 PM

views 15

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रला पुरस्कार

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील.   राज्यस...

November 30, 2024 8:22 PM November 30, 2024 8:22 PM

views 10

काँग्रेसच्या मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रतिपादन

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया पूर्णपणे पारदर्शक होती, तरीही काँग्रेसने याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्यांचा विचार केला जाईल असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहीलं होतं. त्यावर अंतरिम उत्तर देताना आयोगाने म्हटलंय की मतदार याद्यांचं परिरक्षण करताना सर्व राजकीय पक्षांचा सहभाग होता. मतदानाच्या  टक्केवारीत काहीही विसंगती नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं असून संबंधित माहिती मतदा...

September 27, 2024 7:03 PM September 27, 2024 7:03 PM

views 12

अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आज राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे निर्देश दिले. यासंदर्भात संबंधित विभागांचे आणि कार्यालयांचे अनुपालन अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत. ३१ जुलै २०२४ रोजी मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आजतागायत तीन स्मरणपत्रे देऊनही कोणताही अहवाल सादर प्राप्त झालेला नाही, अस...

August 17, 2024 10:36 AM August 17, 2024 10:36 AM

views 11

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा मोबाईल क्रमांकही जोडता येणार आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आह...

August 17, 2024 10:35 AM August 17, 2024 10:35 AM

views 29

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं काही पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची बॅट हे चिन्ह मिळालं आहे.