डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत निवडणूक आयोग ‘ECINET’ मोबाईल अ‍ॅप लाँच करणार

भारत निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ‘ECINET’ हे मोबाईल अ‍ॅप लाँच करणार आहे.  आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध ४० मोबाईल आणि वेबसाईट अ‍ॅप्सचा समावेश या एकाच अ‍ॅपमध्ये असेल. या अ‍ॅपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात.

 

ECINETचा दर्शनीभाग हा दिसायला आकर्षक असेल तसंच वापरायला सोपा असेल. तसंच या अ‍ॅपमुळे विविध अ‍ॅप्स डाऊनलोड करून त्यात वेगवेगळं लॉग-इन करून मग माहिती संकलित करायचं जिकिरीचं काम आता या नव्या अ‍ॅपमुळे वाचणार आहे. तसंच या नवीन अ‍ॅपवर मिळणारी माहिती ही आयोगाकडून दिली जाणारी अधिकृत माहिती असल्यानं ती त्याची विश्वासार्हताही अधिक असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा