November 22, 2025 7:00 PM November 22, 2025 7:00 PM

views 47

पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये झालेल्या सभेत केलं. शिंदे यांनी डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा इथं आज जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आह...

September 15, 2025 3:48 PM September 15, 2025 3:48 PM

views 24

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देणार

राज्यात  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातल्या राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांमधे  पुरात अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश त्यांनी दिले. संबंधित जिल्ह्यातल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती त्यांनी घेतली.  आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.   मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी ...

July 5, 2025 8:14 PM July 5, 2025 8:14 PM

views 24

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात मराठी ऐवजी सत्तेची लालसा दिसून आल्याची भाजपा आणि शिवसेनेची टीका

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मराठी भाषेच्या आडून द्वेष आणि आगपाखड दिसून आल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही महायुती सरकारनेच मिळवून दिल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी करून दिली.  

July 2, 2025 2:07 PM July 2, 2025 2:07 PM

views 16

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भूस्खलनात परतीचा मार्ग वाहून गेल्यामुळे २८ जूनपासून उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळ जानकी छट्टी गावात महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात, राजस्थान तसंच महाराष्ट्राच्या काही भागांसह, उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण, गोवा,...

June 6, 2025 5:48 PM June 6, 2025 5:48 PM

views 34

माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. विरोधकांनी कितीही टीका केली तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.  

June 3, 2025 7:29 PM June 3, 2025 7:29 PM

views 10

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच लागू करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली. सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर या महिन्यापासून ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफ...

February 21, 2025 3:16 PM February 21, 2025 3:16 PM

views 15

उप-मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या २ संशयितांना अटक

राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बच्या साह्याने उडवण्याची धमकी देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन संशयितांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी ई-मेलद्वारे दिलेल्या धमकीचे मेसेज गोरेगाव तसंच जे जे मार्ग पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

February 6, 2025 7:25 PM February 6, 2025 7:25 PM

views 21

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड इथं झालेल्या सभेत दिली. यासोबतच लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचंही शिंदे म्हणाले. शक्तिपीठ महामार्ग जनतेवर लादला जाणार नाही, ज्याठिकाणी याला विरोध आहे, तिथं काम केलं जाणार नाही असं ते म्हणाले.

February 5, 2025 7:11 PM February 5, 2025 7:11 PM

views 22

येत्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

पुढच्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते आज ठाण्यात कोकण विभागातली म्हाडाची लॉटरी काढताना बोलत होते. लोकांचा विश्वास म्हाडावर आहे, त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर द्या, चांगल्या दर्जाचं घर द्या, घरांची गुणवत्ता आम्ही तपासू, असंही त्यांनी सांगितलं. म्हाडानं गेल्या दीड वर्षात ३ लॉटरी काढल्या असून यापुढंही म्हाडाच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं लॉटरी काढली जाणार आहे. दरवर्षी म्हाडाच्या माध्यमातून ३० हजार घरांची...

January 30, 2025 5:59 PM January 30, 2025 5:59 PM

views 11

सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रभादेवी इथल्या सहा समूह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी  केली. तसंच दादर, माहिम आणि प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकासासंदर्भात आढावा कार्यक्रमाला संबोधित केलं. सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु अशी खात्री शिंदे यांनी यावेळी दिली. सामान्यांना परवडणारे घर देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करायचे असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनेेेे असे निर्णय आणू तसंच रखडलेल्या ...