May 5, 2025 7:58 PM May 5, 2025 7:58 PM

views 12

स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई

स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांची फसवणूक   केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज डब्लूटीसी फरिदाबाद इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह, सहयोगी  कंपन्यांच्या  २ हजार ३४८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तेत दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, आणि गोव्यातल्या जमिनींसह इतर मालमत्तांचा समावेश आहे. आशिष भल्ला नावाच्या या कंपन्यांच्या  प्रमुख संचालकानं १२ हजार गुंतवणूकदारांची दिशाभूल करत त्यांनी गुंतवलेला निधी  परदेशातल्या आपल्या नातेवाईकांच्या कंपन्...

March 10, 2025 1:29 PM March 10, 2025 1:29 PM

views 7

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर ईडीचे छापे

बनावट दारु प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीनं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर आज छापे टाकले आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील १४ ठिकाणी ईडी तपास करत आहे. भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्यासह त्याचा सहकारी लक्ष्मी नारायण बन्सल आणि काही इतरांवर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार ईडीनं छापे टाकले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या चौकशीअंतर्गत, ईडीनं आतापर्यंत विविध आरोपींची सुमारे २०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

January 5, 2025 7:22 PM January 5, 2025 7:22 PM

views 9

ईडीचे मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४ हजार ९५७ कोटी रुपयांच्या  कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख  रुपयांची  बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले आहेत तसंच स्थावर मालमत्ता बळकावण्यासंदर्भातही  पुरावे सापडले आहेत. बँक ऑफ बडोदाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं दाखल केलेल्या  प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे ही कारवाई के...

January 5, 2025 1:39 PM January 5, 2025 1:39 PM

views 6

कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीत ईडीचे छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४,९५७ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख  रुपयांची  बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले आहेत तसंच स्थावर मालमत्ता बळकावण्यासंदर्भातही  पुरावे सापडले आहेत. बँक ऑफ बडोदाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं दाखल केलेल्या  प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे ही कारवाई केली जात...

July 18, 2024 2:53 PM July 18, 2024 2:53 PM

views 10

बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात ईडीचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात छापा टाकला. १ हजार ३९२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी ईडीने १५ ठिकाणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात हरियाणामधल्या महेंद्रगडचे आमदार रावदान सिंह यांच्याविरोधात आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही कारवाई केली आहे.   मेसर्स अलाइड स्ट्रिप्स लिमिटेड या कंपनीच्या नावे १ हजार ३९२ कोटी रुपयांचं घेतलेलं कर्ज बुडवण्यात आलं होतं. या कंपनीशी रावदान सिंह यांचा संबंध असल्याचं ईडीच्या तप...