स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज डब्लूटीसी फरिदाबाद इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह, सहयोगी कंपन्यांच्या २ हजार ३४८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तेत दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, आणि गोव्यातल्या जमिनींसह इतर मालमत्तांचा समावेश आहे. आशिष भल्ला नावाच्या या कंपन्यांच्या प्रमुख संचालकानं १२ हजार गुंतवणूकदारांची दिशाभूल करत त्यांनी गुंतवलेला निधी परदेशातल्या आपल्या नातेवाईकांच्या कंपन्यांच्या खात्यात वर्ग केला होता. भल्लाला ६ मार्च रोजी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचं ईडीनं म्हटलं आहे.
Site Admin | May 5, 2025 7:58 PM | ED raids
स्थावर मालमत्तांच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई
