January 6, 2026 1:14 PM January 6, 2026 1:14 PM

views 6

बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना विस्तृत कारवाई अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

पश्चिम बंगालमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण कामाच्या वेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा निवडणूक निरीक्षक सी. मुरूगन यांनी आरोप केल्या प्रकरणी, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विस्तृत कारवाई अहवाल सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. ३० डिसेंबर रोजी २४ परगणा जिल्ह्यात निरीक्षक म्हणून काम करताना आपल्यावर हल्ला झाल्याचा मुरुगन यांचा आरोप आहे.  या प्रकरणी  मुरूगन यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात न आल्याचं आढळल्याचं निरीक्षण आयोगाने नोंदव...

November 4, 2025 8:07 PM November 4, 2025 8:07 PM

views 18

निवडणूक आयोगाचा आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा प्रारंभ

भारत निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा आज प्रारंभ केला.  या कार्यक्रमाअंतर्गत ७ देशांमधून आलेले १४ प्रतिनिधी येत्या ५ आणि ६ नोव्हेंबरला बिहारला भेट देऊन, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचं निरीक्षण करणार आहेत.    देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी आज नवी दिल्ली इथं या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतीय निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली गेली, तसंच इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्राच...

November 4, 2025 2:29 PM November 4, 2025 2:29 PM

views 60

मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू

निवडणूक आयोगाने आजपासून एसआयआरचा म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून  एकंदर ५१ कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे. या मतदारांची पडताळणी करून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. यापूर्वी बिहारमध्ये पडताळणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यात मतदारांच्या पडताळणीनंतर सात कोटी ४२ लाख मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.   दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगड, गोवा, गुजरात, के...

October 29, 2025 9:10 PM October 29, 2025 9:10 PM

views 118

महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. काही अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेतल्या जातात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्रं विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणुक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्यूशन कमिटी अभ्यास करत आहे, तिचा अहवाल अद्याप न आल्यानं व्हीव्हीपॅटचा वाप...

October 27, 2025 7:50 PM October 27, 2025 7:50 PM

views 43

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार-ECI

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. मतदारयाद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनरीक्षण टप्प्याटप्प्याने राबवलं जाईल, असं ज्ञानेश कुमार म्हणाले. एकही मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि चुकीची व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. 

October 26, 2025 8:03 PM October 26, 2025 8:03 PM

views 18

ECI: निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी नियमावली जाहीर

बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार संपल्यापासून मतदान होण्यापर्यंतच्या शांतता कालावधीत निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी निवडणूक आयोगानं नियमावली जाहीर केली आहे. या ४८ तासांच्या कालावधीत निवडणुकीवर प्रभाव टाकणारा कोणताही मजकूर प्रसारित करू नये अशा सूचना आयोगानं वृत्तवाहिन्या, नभोवाणी आणि केबल नेटवर्कना केल्या आहेत. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा आणि इतर राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ६ आणि...

October 26, 2025 7:41 PM October 26, 2025 7:41 PM

views 18

देशातल्या सर्व प्रदेशातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेला सुरुवात

देशातल्या सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची दोन दिवसांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. या परिषदेला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त सुखबिर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांंनी  अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी देशभरात होणाऱ्या मतदार याद्या पुनरावलोकनाच्या तयारीचा तसेच याआधीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांच्या बाबतीत झालेल्या प्रगतीचा आढावाही यावेळी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.

October 7, 2025 2:24 PM October 7, 2025 2:24 PM

views 72

मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण देशभरात करण्यात येणार

मतदार यांद्यांच्या सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया देशभरात राबवण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलं.  ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. देशभरात मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग तयारी करत असून याच्या तारखा निश्चित करून लवकर याची घोषणा करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.  निवडणूक आयोगाने बिहारमधे सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया नुकतीच केली, यात ६९ लाख जणांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं. त्यानंतर बिहारमधे मतदारांची संख्या ७ कोटी ४३ ...

October 6, 2025 4:52 PM October 6, 2025 4:52 PM

views 33

बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार

निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता नवी दिल्लीत बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे  निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासह वार्ताहर परिषद घेणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या कि आदर्श आचारसंहिता लागू होईल. २४३ सदस्यांचा समावेश असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २२ नोव्हेंबरला समाप्त होत आहे.

October 5, 2025 2:32 PM October 5, 2025 2:32 PM

views 29

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी  निवडणूक आयोगानं आज तिथल्या विविध प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी, केंद्रीय पोलीस दल आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. निवडणुकीच्या काळात, काळा पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचा धोका ओळखून करायच्या  उपाययोजनांबाबत  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं  त्यांच्याशी संवाद साधला.    निवडणुका मुक्त, निःपक्षपाती आणि  शांततापूर्व वातावरणात व्हाव्या यासाठी उपस्थितांनी मतं मांडली. या बैठकी...