January 5, 2026 1:34 PM January 5, 2026 1:34 PM

views 10

आसामला भूकंपाचा धक्का

आसामला आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमाराला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरीगाव जिल्ह्याजवळ ५० किलोमीटर खोलवर आहे. हा भाग मध्य आसामचा असून भूकंपात अद्याप कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. भूतान, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारच्या देशांमध्येही भूकपांचे धक्के जाणवले.

November 3, 2025 12:42 PM November 3, 2025 12:42 PM

views 24

अफगाणिस्तानमधे भूकंपामुळे १० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधे काल रात्री झालेल्या भूकंपामुळे १० जणांचा मृत्यू झाला असून २६० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.३ एवढी नोंदवली गेली आहे. देशाच्यचा वायव्य, मध्य, पश्चिम, उत्तर भागात मध्यरात्रीच्या सुमारास हा भूकंप झाल्याचं अफगाणिस्तान आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणानं म्हटलं आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदूू मजार ई शरिफ शहराजवळ खोल्म इथं असल्यामुळे सर्वाधिक नुुकसान याच भागात झालं. जखमींवर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

June 3, 2025 1:36 PM June 3, 2025 1:36 PM

views 18

ग्रीस आणि टर्कीमध्ये भूकंपाचे धक्के

ग्रीसमध्ये टर्कीच्या सीमेजवळ आज सकाळी डोडेकेनीज बेटांवर ६ पूर्णांक २ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्याच सुमाराला टर्कीमध्ये किनारपट्टी भागातल्या मारमारिस शहरालाही भूकंपाचा धक्का बसला. तो ५ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा होता. यामध्ये  मारमारिस शहरातले दोन नागरिक जखमी झाले.

April 23, 2025 6:42 PM April 23, 2025 6:42 PM

views 18

तुर्कियेमधे इस्तंबुल शहरात भूकंपाचे धक्के

तुर्कियेमधे इस्तंबुल या शहरात आज भूकंपाचे धक्के बसले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार यातला सर्वात शक्तिशाली भूकंप ६ पूर्णांक २ शतांश रिश्टर स्केल इतका होता. इस्तंबुलच्या नैर्ऋत्येला ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारमारा समुद्रात या भूकंपाचं केंद्र होतं. सुदैवाने आतापर्यंत कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. 

March 28, 2025 8:34 PM March 28, 2025 8:34 PM

views 12

थायलंड, म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात ३ ठार, ९० जण जखमी

थायलंड आणि म्यानमारमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून किमान तीन जण मृत्यूमुखी पडले, तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप ९० जण बेपत्ता आहेत. ७ पूर्णांक ७ रिख्टर स्केलच्या या भूकंपाचं केंद्र म्यानमारमधल्या मंडालेजवळ होतं. या दुर्घटनेनंतर म्यानमार सरकारनं सहा प्रांतांमध्ये आणीबाणी लागू केली आहे. या भूकंपामुळं मंडाले इथल्या ऐतिहासिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचे हादरे चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतातही जाणवले आणि यात काहीजण जखमी झाले आहे...

February 28, 2025 3:05 PM February 28, 2025 3:05 PM

views 22

भारतासह इतर देशांमध्ये भूकंपाचे धक्के

भारतासह नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तान देशांमधल्या अनेक भागात आज सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात, सिलीगुडी आणि पाटणासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पाटणा मध्ये आज पहाटे अडीच वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 इतकी नोंदवण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र नेपाळ होते.  नेपाळमध्ये ६ पूर्णांक १ तीव्रतेचा भूकंप झाला.  या भूकंपात अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं  वृत्त  नाही.

February 17, 2025 8:35 PM February 17, 2025 8:35 PM

views 16

नवी दिल्लीत भूकंपाचे झटके

राजधानी नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धौल कुवा इथं पाच किलोमीटर खोलीवर होता. यात जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.    बिहारच्या सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यातही आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले.  आज सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंप मापकावर त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू सिवानपासून १० किलो मीटर अंतरावर अस...

January 7, 2025 1:36 PM January 7, 2025 1:36 PM

views 18

नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जणांचा मृत्यू

नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जण मृत्युमुखी पडले, तर ३८ जण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेट मधल्या झिझांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या काही भागात या भूकंपाचे धक्के बसले. बिहारच्या काही भागात हे धक्के तीव्र स्वरूपाचे होते, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

December 4, 2024 3:08 PM December 4, 2024 3:08 PM

views 10

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे तीव्र धक्के

महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडे सातच्या सुमारास भुकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भुकंपाची तीव्रता ५ पूर्णांक ३ दशांश रिक्टर स्केल असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केलं आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगु या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, गोदीवरी नदीच्या खोऱ्यात भुकंपाचे धक्के कमी अधिक प्रमाणात जाणवले. या दशकातला हा सर्वात तीव्रतेचा भूकंप असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. 

December 4, 2024 2:23 PM December 4, 2024 2:23 PM

views 11

तेलंगणातल्य़ा अनेक भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

तेलंगणातल्य़ा अनेक भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्का जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक तीन दशांश नोंदली गेली. सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचं केंद्र मुलुगु जिल्ह्यात होतं. करीमनगर, पेद्दापल्ली, जनगाव,महबूबाबाद, हनुमकोंडा वरंगळ, आणि भद्राद्री कोथागुडम या जिल्ह्यांमधे हा धक्का जाणवल्याचं राष्ट्रीय भूगर्भ संशोधन केंद्रानं सांगितलं. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागातही हा धक्का जाण...