October 10, 2025 1:31 PM October 10, 2025 1:31 PM

views 19

‘दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगणिस्तानने एकत्र येऊन काम करण्याची गरज’

दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानाने एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केला आहे. नवी दिल्ली इथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतरच्या भाषणात ते बोलत होते. दोन्ही देशांची विकास आणि समृद्धबाबतची वचनबद्धता समान आहे. सरकार अफगाणिस्तानाच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असल्याचं जयंशकर यावेळी म्हणाले.   काबुलमधल्या भारताच्या तांत्रिक मिशनला भारतीय दुतावासा...

August 23, 2025 8:10 PM August 23, 2025 8:10 PM

views 26

भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु – मंत्री डॉ. एस जयशंकर

भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ ला संबोधित करत होते. देशातले  शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं  रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले.    अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटींमध्ये भारताला आपल्या मर्यादांची स्पष्ट जाणीव असून, देशहित लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेनं भारताच्या तेल आयाती...

August 20, 2025 9:50 AM August 20, 2025 9:50 AM

views 11

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर मॉस्कोमध्ये दाखल

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर काल संध्याकाळी रशियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर मॉस्कोला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान, परराष्ट्र व्यवहारमंत्री रशियाचे समपदस्थ सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्यांचा आढावा घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी उभे देशांच्या दृष्टिकोनाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. दीर्घकालीन आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भारत-रशिया विशेष धोरणात्मक भागीदारीला आणखी बळकटी देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. डॉ. एस. जयशंकर आज...

April 11, 2025 7:59 PM April 11, 2025 7:59 PM

views 6

‘गतीशक्ती’ उपक्रमाद्वारे भारत सरकारने व्यवसायानुकूलता वाढवली – मंत्री एस जयशंकर

गती शक्ती उपक्रमाद्वारे भारत सरकारने व्यवसायानुकूलता वाढवली असून आधुनिक पायाभूत सोयी सुविधा, सार्वजनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. इटली-भारत व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाच्या आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांमुळे भारतात उद्योग सुरु करण्याचं आकर्षण जगात निर्माण झालं आहे असं ते म्हणाले.   युरोपीय संघाच्या आयुक्तवृंदाच्या भारत दौऱ्यात मुक्त व्यापार करारावरची बोलणी या व...

February 17, 2025 9:22 AM February 17, 2025 9:22 AM

views 1

हिंद महासागर क्षेत्रातील देशांमध्ये संपर्क यंत्रणा पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण करण्याची गरज – मंत्री एस जयशंकर

हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून , या क्षेत्रातील देशांमध्ये परस्पर सहमतीने संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण असली पाहिजे, अस प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एस जय शंकर यांनी केल . ओमान मधील मस्कत इथ आयोजित आठव्या हिंद महासागर संमेलनात ते काल उद्घाटन सत्रात बोलत होते. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडोर आणि भारत म्यानमा थायलंड त्रिपक्षीय राजमार्ग या दोन्ही योजनांना सामूहिक संपर्क योजना मानण्यात याव अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केल. भारत हिंद महासागरच्या दोन्ही किनाऱ्यावरील द...

December 8, 2024 8:05 PM December 8, 2024 8:05 PM

views 2

भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं भूमध्य प्रदेशाची भूमिका महत्वाची – मंत्री एस. जयशंकर

येत्या काळात भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं आखाती तसंच भूमध्य प्रदेशाची भूमिका महत्वाची असणार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते बहरीन इथं झालेल्या मनामा डायलॉगला संबोधित करत होते. हरीत हायड्रोजन आणि हरीत अमोनिया सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आखाती तसंच भूमध्य प्रदेशांची भूमिका महत्वाची असेल असं ते म्हणाले. यावेळी जयशंकर यांनी पश्चिम आशियायी प्रदेशाबाबतच्या भारताच्या सर्वसमावेशक धोरणाबाबत आपल्या संबोधतानून सांगितलं, तसंच भारताच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंध...

December 4, 2024 8:11 PM December 4, 2024 8:11 PM

views 7

पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची कुवैतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांच्याशी चर्चा

पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत कुवैतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांच्याशी चर्चा केली. भारत कुवैतबरोबर ऊर्जा, गुंतवणूक,  माहिती आणि तंत्रज्ञान, व्यापार आदी क्षेत्रांमधले द्विपक्षीय संबंध  दृढ  करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं जयशंकर  या चर्चेदरम्यान म्हणाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये  प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीविषयी  चर्चा झाली. कुवैतमध्ये राहणारे भारतीय दोन्ही देशातले दुवा म्हणून काम करतात  असंही जयशंकर यावेळी म्हणाले.

November 3, 2024 6:04 PM November 3, 2024 6:04 PM

views 2

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर दौऱ्यावर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आपल्या सहा दिवसांच्या ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर दौऱ्यासाठी आज ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथं पोहोचले. या भेटीदरम्यान ते ब्रिस्बेनमधे ऑस्ट्रेलियामधल्या भारताच्या चौथ्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करतील. कॅनबेरा इथं ते ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत परराष्ट्रमंत्र्यांच्या १५ व्या फ्रेमवर्क संवाद परिषदेचं संयुक्त अध्यक्षपदही भूषवणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संसद भवनात होणाऱ्या दुसऱ्या रायसिना डाउन अंडरच्या उद्घाटन सत्रात ते बीजभाषण देणार आहेत. या दौऱ्...

November 2, 2024 7:14 PM November 2, 2024 7:14 PM

views 1

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं -परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं असल्याचं असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलत होते. आज भारत जास्तीत जास्त देशांशी मैत्री करू इच्छितो, त्याचवेळी काही मित्र इतरांपेक्षा अधिक गुंतागुंत निर्माण करणारेही असू शकतात, तर काही मित्रांसोबत संस्कृतिक किंवा राजनैतिक शिष्टाचाराच्या बाबतीत परस्पर सामायिक करण्यासारखी परिस्थिती नसू शकते ही बाबही त्यांनी नमूद केली.  आपल्या भागिदार देशांचं मूल्यां...

October 16, 2024 3:28 PM October 16, 2024 3:28 PM

views 9

कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्यं आव्हानं असून, कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं तेवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या परिषदेला संबोधित करत होते. सीमेपलिकडून दहशतवाद होत असताना व्यापाराला प्रोत्साहन देता येत नाही, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी बजावलं. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला भेट देण्याची ही गेल्या नऊ वर्षातली पहिलीच व...