November 2, 2024 7:14 PM

views 11

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं -परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं असल्याचं असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलत होते. आज भारत जास्तीत जास्त देशांशी मैत्री करू इच्छितो, त्याचवेळी काही मित्र इतरांपेक्षा अधिक गुंतागुंत निर्माण करणारेही असू शकतात, तर काही मित्रांसोबत संस्कृतिक किंवा राजनैतिक शिष्टाचाराच्या बाबतीत परस्पर सामायिक करण्यासारखी परिस्थिती नसू शकते ही बाबही त्यांनी नमूद केली.  आपल्या भागिदार देशांचं मूल्यां...

October 16, 2024 3:28 PM

views 18

कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्यं आव्हानं असून, कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं तेवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या परिषदेला संबोधित करत होते. सीमेपलिकडून दहशतवाद होत असताना व्यापाराला प्रोत्साहन देता येत नाही, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी बजावलं. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला भेट देण्याची ही गेल्या नऊ वर्षातली पहिलीच व...

September 28, 2024 1:02 PM

views 19

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथं बिमस्टेक परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्क इथं बिमस्टेक परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. भौतिक, सागरी आणि डिजिटल संपर्क सुधारण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली, तसंच क्षमता विकास, कौशल्य विकास यावरही भर देण्याबाबत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्सचा विकास करणं हा सामूहिक संकल्प असल्याचंही ते म्हणाले.

September 14, 2024 9:31 AM

views 28

सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली असल्याचं एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

आधुनिक भारताची टप्प्याटप्प्याने उभारणी होत असून, सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली आहे असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी केलं आहे. हीच तत्त्व आणि धोरण केंद्रस्थानी ठेवून सरकार कारभार करत आहे. ते काल जिनिवा इथं भारतीय जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.   सरकार महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत आहे. जी-20 परिषदेच्या अध्यक्षकाळात याच संकल्पनेवर भर देण्यात आला होता असं ते पुढे म्हणाले. जयशंकर यांनी देशात झालेल्या निवडणुक...

July 2, 2024 2:24 PM

views 29

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली अस्ताना इथं ४ जुलैपासून  होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेत सहभागी होणाऱ्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर करणार आहेत.  शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची ही २४ वी बैठक असून या बैठकीत गेल्या दोन दशकातल्या विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींची समीक्षा करण्यात येणार आहे. या बरोबरच सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य आणि प्रांतीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा होईल. या बैठकीत भारताची बाजू प्रधानमंत्री नरेंद्र ...