July 15, 2025 12:37 PM July 15, 2025 12:37 PM

views 12

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर असून आज त्या कटक इथं रवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत तसंच रवेनशॉ कन्याशाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करणार आहेत.   15 व्या शतकातले महान ओडिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार असून, कलिंगरत्न पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. हा दौरा आटोपून राष्ट्रपती संध्याकाळी दिल्लीत पोहोचतील.

July 14, 2025 10:50 AM July 14, 2025 10:50 AM

views 21

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात त्या भुवनेश्वर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.   तसंच उद्या (मंगळवारी) रेवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती मुर्मू उपस्थित राहतील, यावेळी त्यांच्या हस्ते रेवेनशॉ गर्ल्स हायस्कूलच्या तीन इमारतींच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात येणार आहे.   याशिवाय कटक इथं आदिकबी सरला दास यांच्या जयंती समारंभाला राष्ट...

May 30, 2025 7:00 PM May 30, 2025 7:00 PM

views 18

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. या पुरस्कार सोहळ्यात, राष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीनं सेवा देणाऱ्या १५ परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला.   त्यात जळगाव जिल्ह्यातल्या कठोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका आणि मिडवाइफ सुजाता अशोक बागूल यांचा समावेश आहे. बागूल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १८ वर्षांच्या ...

April 2, 2025 9:32 AM April 2, 2025 9:32 AM

views 10

डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा

रिझर्व्ह बॅंक ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ असून भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा काल मुंबईत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला; त्यावेळी त्या बोलत होत्या.   सामान्य नागरिकांचा भारतीय रिझर्व्ह बँकेवरचा विश्वास हेच रिझर्व्ह बँकेचं गेल्या नऊ दशकातलं सर्वात मोठं यश आहे, असं त्या म्हणाल्या. विकसित भा...

March 24, 2025 2:41 PM March 24, 2025 2:41 PM

views 4

लवकरच छत्तीसगड राज्य नक्षलवादातून मुक्त होईल असा राष्ट्रपतींना विश्वास

डाव्या अतिरेकीवादाने प्रभावित झालेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच छत्तीसगड हे राज्य नक्षलवादातून मुक्त होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. त्या आज रायपूर इथे छत्तीसगढ विधानसभेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. ९० सदस्यांच्या या विधानसभेत १९ महिला आमदार असून २०२३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती, याचं कौतुक राष्ट्रपतींनी यावेळी केलं. 

March 22, 2025 9:44 AM March 22, 2025 9:44 AM

views 6

वंचित वर्गाप्रती संवेदनशीलता ही देशाची प्रतिष्ठा – राष्ट्रपती

वंचित वर्गाप्रती असलेली संवेदनशीलता ही समाजाची आणि देशाची प्रतिष्ठा ठरवते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल राष्ट्रपती भवनात आयोजित पर्पल फेस्ट कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होत्या. करुणा,सर्वसमावेशकता आणि सलोखा ही भारतीय संस्कृतीची मूल्ये असून अपंगत्वाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी जनजागृती करणं आणि अपंग व्यक्तींना समाजात समजून घेणं, स्वीकारणं हा 'पर्पल फेस्ट'चा उद्देश असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.     सामाजिक न्याय आणि अधि...

March 11, 2025 2:55 PM March 11, 2025 2:55 PM

views 5

पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतींचा मिलाफ दिसून येतो- राष्ट्रपती

पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतींचा मिलाफ दिसून येतो आणि इथल्या विद्यार्थी तसंच शिक्षकांमध्ये भारतातल्या विविधतेच प्रतिबिंब उमटलेलं दिसतं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. पंजाबातल्या बठिंडा विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या.   बठिंडा इथून जवळ असलेल्या तलवंडी इथल्या तखत श्री दमदमा साहिब इथे गुरु नानकांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातला काही काळ घालवला होता, अशा महत्वाच्या स्थानामधील अध्यात्मिक ऊर्जा आणि वीररस इथेह...

February 16, 2025 8:12 PM February 16, 2025 8:12 PM

views 17

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदी महोत्सव २०२५ चं उद्घाटन

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आदी महोत्सव २०२५ चं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात त्यांनी गेल्या १० वर्षात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रभावी पावलं उचलण्यात आल्याचं प्रतिपादन केलं.   आदिवासी लोकांच्या परंपरा आणि राहणीमान देशाची संस्कृति समृद्ध करतात, असं त्या म्हणाल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी आर्थिक तरतूद तिपटीनं वाढवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं .

December 25, 2024 8:13 PM December 25, 2024 8:13 PM

views 21

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आजची शतकमहोत्सवी जयंती आपणा सर्वांसाठी सुशासनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथं देशातल्या पहिल्या, महत्त्वाकांक्षी आणि बहुद्देशीय केन-बेटवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या पहिल्या, ओंकारेश्वर तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण, तसंच १ हजार १५३ अटल ग्राम सुशासन भवनांचं भूमिपूजनही मोदी यांनी य...