December 10, 2025 1:13 PM December 10, 2025 1:13 PM
27
मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध- राष्ट्रपती
मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. माणूसपणाचा हक्क निर्विवाद आणि अबाधित राहिला पाहजे असं सांगून त्या म्हणाल्या की न्याय्य, समताधारित, आणि संवेदनक्षम समाजव्यवस्था तयार करण्यासाठीची मशागत मानवाधिकार दिवस कार्यक्रमांमधून होत असते. देशात न्याय हा देखील जन्मसिद्ध हक्क असला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.