November 5, 2025 8:29 PM November 5, 2025 8:29 PM

views 19

डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात

२५ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेअंतर्गत चेहरेपट्टी प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला असून यात सातत्यानं वाढ होत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा आज सिंह यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ९० वर्षांहून अधिक वय असलेल्या ३० हजारहून जास्त ज्येष्ठ नागरिकांना या तंत्रज्ञानाचा लाभ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्त देशभरातील दोन हजार जिल्हे, उपविभाग, शहरांमध्ये शि...

September 6, 2025 8:22 PM September 6, 2025 8:22 PM

views 14

जीएसटीतल्या दरकपातीमुळं कृषी क्षेत्रावर मोठा सकारात्मक परिणाम होईल-केंद्रीय कृषी मंत्री

जीएसटीतल्या दरकपातीमुळं कृषी क्षेत्रावर मोठा सकारात्मक परिणाम होईल, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज म्हणाले. यामुळं कृषी क्षेत्रातला उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढेल, असा विश्वास त्यांनी भोपाळमध्ये वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला.

July 28, 2025 7:55 PM July 28, 2025 7:55 PM

views 7

विज्ञान आणि नवीन उपक्रम देशाच्या आर्थिक वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील- डॉ. जितेंद्र सिंह

येत्या काळात विज्ञान आणि नवीन उपक्रम फक्त पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे नसून देशाच्या आर्थिक वाढीसाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील असं, मत पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे.   पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत विविध संस्थांनी विकसित केलेली १४ प्रमुख उत्पादनं आणि उपक्रमांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी आता मेघदूतवर झाली आहे. त्यावर येणाऱ्या दैनंदिन हवामानविषयक माहितीमुळे सुरक्षित मच्छिमारी क्षेत्र तयार ...

July 4, 2025 6:52 PM July 4, 2025 6:52 PM

views 17

आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही-जितेंद्र सिंह

आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही असं मत केंद्रिय कार्मिक, लोक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. सिंदूरसारख्या गुंतागुंतीच्या मोहिमेतला भारताचा विजय हा, सशस्त्र दलं आणि नागरी प्राधिकरणांमधला सुरळीत समन्वय आणि त्याला स्वदेशात विकसित संरक्षण विषयक तंत्रज्ञानाचं पाठबळ मिळाल्यामुळेच शक्य झाल्याचं उदाहरणही...

April 18, 2025 8:16 PM April 18, 2025 8:16 PM

views 28

भारत आपल्या अंतराळ प्रवासात पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज

आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायूसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. अ‍ॅक्सिओम स्पेसच्या ए एक्स-४ या अंतराळ मोहिमेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली आहे. या मोहिमेद्वारे भारत आपल्या अंतराळ क्षेत्रात एक निर्णायक अध्याय लिहिण्याठी सज्ज असल्याचं अवकाश आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. येत्या काही महिन्यांतल्या इस्रोच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नवी द...

January 1, 2025 9:44 AM January 1, 2025 9:44 AM

views 36

आगामी दहा वर्षांत अंतराळ संबंधित अर्थव्यवस्थेत पाचपट वाढ होईल असा अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचा विश्वास

आगामी दहा वर्षांत अंतरिक्षाशी संबंधित अर्थव्यवस्थेत पाचपट वाढ होऊन ती44 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असं अणुउर्जा आणि अंतरिक्ष राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. 2023 मध्ये अंतराळ क्षेत्रातली गुंतवणूक एक हजार कोटी रुपयांवर गेली होती. परकीय चलन गंगाजळी वाढवण्यात अंतराळ क्षेत्राचा वाटा मोलाचा आहे. इतर देशांच्या उपग्रह प्रक्षेपणातून भारताला आतापर्यंत 220 दशलक्ष युरोचं उत्पन्न मिळालं असून त्यातलं 85 टक्के उत्पन्न गेल्या 8 वर्षांमधलं आहे असं जितेंद्र...

December 12, 2024 2:21 PM December 12, 2024 2:21 PM

views 13

२०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतरिक्ष स्टेशन असेल – डॉ. जितेंद्र सिंह

भारताची २०३५ पर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचं अंतराळस्थानक उभारण्याची योजना आहे, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल सांगितलं. भारताची २०४० पर्यंत चंद्रावर उतरण्याचीही योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीत विज्ञान क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांच्या आजवरच्या कामगिरीविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं अंतराळ क्षेत्रात केलेल्या सुधारणांची माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंत ४३२ परदेशी उपग्रह भारतातून प्रक्षेपित केले असल्याचं ते म्हणाले आणि त्य...

July 17, 2024 1:06 PM July 17, 2024 1:06 PM

views 14

फरीदाबाद येथे प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

फरिदाबाद इथल्या ट्रान्स्लेशनल आरोग्यविज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये काल, आरोग्य संशोधनाशी निगडीत आशियातल्या पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. ही सुविधा आशियातली पहिली आणि जागतिक स्तरावरील 9 वी प्रयोगशाळा असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.   सिंग यांच्या हस्ते जेनेटिकली डिफाईंड ह्युमन असोसिएटेड मायक्रोबियल कल्चर कलेक्शन या सुविधेचे उद्धाटन झाले. ही सुविधा संशोधन आणि विकास यासाठी संशोधन...

July 5, 2024 8:18 PM July 5, 2024 8:18 PM

views 12

फॅटी लिव्हर आजाराची चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज – मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

फॅटी लिव्हर या यकृताच्या आजाराच्या विविध स्तरांचं सहज निदान करता यावं यासाठी सोपी आणि परवडणाऱ्या दराची निदान चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत, यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेत यकृताचे आजार टाळण्यासाठी, भारत आणि फ्रान्सनं हाती घेतलेल्या एका उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. भारताच्या प्रत्येक तिसऱ्या नागरिकाला फॅटी लिव्हर हा आजार असल्याची माहिती त्यांनी दिली.

June 25, 2024 8:29 PM June 25, 2024 8:29 PM

views 14

भारताची अण्विक वीजनिर्मिती क्षमता येत्या पाच वर्षात सुमारे ७० टक्क्यापर्यंत वाढेल – मंत्री जितेंद्र सिंग

भारताची अण्विक वीजनिर्मिती क्षमता येत्या पाच वर्षात सुमारे ७० टक्क्यापर्यंत वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्लीत अणूऊर्जा विभागाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी अणूऊर्जा आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीची माहिती दिली. सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला, आणि आगामी योजनांसंदर्भात निर्देश दिले.