आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही असं मत केंद्रिय कार्मिक, लोक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. सिंदूरसारख्या गुंतागुंतीच्या मोहिमेतला भारताचा विजय हा, सशस्त्र दलं आणि नागरी प्राधिकरणांमधला सुरळीत समन्वय आणि त्याला स्वदेशात विकसित संरक्षण विषयक तंत्रज्ञानाचं पाठबळ मिळाल्यामुळेच शक्य झाल्याचं उदाहरणही त्यांनी या संवादात मांडलं. यातून देशाच्या मनुष्यबळाची अतूट भावना आणि आत्मनिर्भरतेचं सामर्थ्य दिसून येतं असं ते म्हणाले. आजचा भारत हा केवळ सुधारणा आणि कामगिरीच्या बरोबरीनं प्रत्येक आव्हानागणिक परिवर्तन घडवून आणत असल्याचं ते म्हणाले. प्रशासनाचं विद्यमान प्रारुप हे ताणाच्या परिस्थितीत अधिक सक्षम होत आहे, तर नवोन्मेषाच्या आधारानं प्रगती करत आहे असं जितेंद्र सिंह म्हणाले.
Site Admin | July 4, 2025 6:52 PM | Dr. Jitendra Singh | IIPA
आजच्या बहुआयामी प्रशासनाच्या युगात इतरांपासून अलिप्तपणे काम करणं हिताचं नाही-जितेंद्र सिंह
