February 22, 2025 1:34 PM

views 23

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तिन्ही सेनादलांच्या संयुक्त प्रमुखांची हकालपट्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिन्ही सेनादलांचे संयुक्त प्रमुख हवाई दलाचे जनरल  C Q ब्राऊन ज्युनियर यांना अचानक पदावरुन दूर केलं.  गेले १६ महिने ते या पदावर कार्यरत होते आणि गेल्या ४० वर्षांपासून हवाई दलाच्या सेवेत होते. ते कृष्णवर्णीयांच्या हक्कांचे समर्थक होते.    त्यांच्या जागी ट्रम्प यांनी हवाई दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डान रेझिन केन यांची नियुक्ती केली आहे. काही काळापूर्वी ते CIA मध्ये लष्करी व्यवहारविषयक सह संचालक म्हणून कार्यरत होते.    याशिवाय नौदलाच्य...

February 22, 2025 12:31 PM

views 20

… ट्रम्प यांच्या आदेशाला फेडरल न्यायाधीशांची स्थगिती

अमेरिकेत विविधता, समता, आणि समावेशन कार्यक्रमांसाठी सरकारी निधी कमी करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला फेडरल न्यायाधीशांनी स्थगिती दिली आहे.   हा आदेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन करत असून खटला सुरू असेपर्यंत तो स्थगित राहील असं  बाल्टिमोरमधले न्यायाधीश ॲडम अबेलसन हा निर्णय देताना म्हटलं आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी या आदेशावर स्वाक्षरी केली होती.   

February 22, 2025 10:08 AM

views 26

रशिया-यूक्रेन वाटाघाटींमध्ये वोलोदीमीर झेलीन्स्की यांची उपस्थिती महत्वाची नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन

रशिया-यूक्रेन दरम्यान सुरू असलेलं युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलीन्स्की यांची उपस्थिती महत्वाची नसल्याचं प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.   युद्धाची सुरुवात रशियाने यूक्रेनवर हल्ला करून झाली हे ट्रम्प यांनी मान्य केलं, मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलीन्स्की यांच्यावर त्यांनी युद्ध थांबवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. दरम्यान, युक्रेनमधील अमेरिकेचे ...

February 20, 2025 1:41 PM

views 27

वोलोदिमिर झेलेन्स्की अत्यंत कमकुवत नेता असल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

  रशिया- युक्रेन युद्धासाठी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की जबाबदार असून ते अत्यंत कमकुवत नेते असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रशिया-युक्रेन युध्द संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी घडवून आणण्यासाठी सध्या चर्चा सुरु आहे.   या चर्चेतून युक्रेनला वगळण्यात आल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्सकी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही टीका केली आहे. झेलेन्स्की यांच्या उपस्थितीशिवाय देखील शांतता करार केला जाऊ शक...

February 14, 2025 2:37 PM

views 28

…तर ‘ब्रिक्स’ देशाच अस्तित्व नष्ट होईल – डोनाल्ड ट्रम्प

‘ब्रिक्स’ देशांनी डॉलरची स्पर्धा करणारं चलन सुरु केलं, तर या राष्ट्र समूहाचं अस्तित्व नष्ट होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  यांनी दिला आहे. तसंच ‘ब्रिक्स’ समूहातला एखादा देश ही योजना घेऊन पुढे गेला, तर अमेरिका त्या देशावर १०० टक्के आयात शुल्क आकारेल, असं त्यांनी म्हटलं आहे. जगातल्या इतर देशांनी आकारलेल्या आयात शुल्काशी जुळणाऱ्या दरांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देणाऱ्या ठरावावर नुकतीच ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर ते बोलत होते.      ब्रिक्स समूहाच्या सदस्य...

February 10, 2025 1:52 PM

views 24

अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अल्युमिनियम मालावर २५% शुल्क आकारण्याची घोषणा – डोनाल्ड ट्रम्प

कॅनडा आणि मेक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या स्टील आणि अल्युमिनियम मालावर २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा आज होणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांना दिली. अर्थसंकल्पातली तूट भरून काढण्यासाठी हा चांगला उपाय असल्याचं ते म्हणाले.

February 8, 2025 2:56 PM

views 16

US: जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

अमेरिकेत व्हिसा वर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सिऍटल इथल्या फेडरल न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कार्यकारी आदेशाला न्यायालयानं अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे. ट्रम्प हे संविधानाचा दुरुपयोग करून धोरणात्मक डावपेच खेळत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. याआधी मेरीलँड इथल्या न्यायालयानंही अशाच प्रकारचा निर्णय दिला होता...

January 24, 2025 1:35 PM

views 9

अमेरिकेतील माजी ३ नेत्यांच्या हत्या दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्याच्या आदेशावर डोनल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतले तीन माजी नेते, जॉन एफ केनेडी, रॉबर्ट एफ केनेडी आणि मार्टिन लुथर किंग जुनिअर यांच्या हत्येसंदर्भातल्या नोंदी आणि दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, त्यांचे बंधू रॉबर्ट एफ केनेडी आणि मानवाधिकाराविषयी लढा देणारे नेते मार्टिन लुथर किंग जुनिअर यांच्या हत्येनं अमेरिकेच्या राजकीय इतिहासात मोठी खळबळ उडवून दिली होती.   या हत्यांमागची संदिग्धता अद्याप कायम असून अमेरिकेच्या नागरिकांमध्ये...

January 24, 2025 10:21 AM

views 16

नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी संरक्षणावर खर्च होणारी रक्कम जीडीपीपैकी 5 टक्क्यांपर्यंत वाढवावी

नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी संरक्षणावर खर्च होणारी रक्कम आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी म्हणजे जीडीपीपैकी पाच टक्क्यांपर्यंत वाढवावी असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे. जागतिक संरक्षण खर्चाचा अनावश्यक भार अमेरिकेवर पडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ट्रंप दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत बोलत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन केल्यास कर कमी केले जातील, असाही प्रस्ताव ट्रंप यांनी मांडला.   कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन केलं नाही तर जास्त कर लादले जात...

January 23, 2025 3:08 PM

views 10

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या घोषणेविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाची न्यायालयात धाव

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेली राज्यं आणि नागरी हक्क गटांच्या युतीनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला आहे. कोलंबिया आणि सॅन फ्रान्सिस्को शहरासह २२ डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्यांनी बोस्टन आणि सिएटल इथल्या संघीय न्यायालयांमध्ये हे खटले दाखल केले.   ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच अमेरिकेतील स्थलांतराला नियंत्रित करण्याच्या उद्देशानं एकगठ्ठा कार्यकारी आदेश जारी केले. अध्यक्षांनी आपल्...