March 14, 2025 10:21 AM March 14, 2025 10:21 AM
6
अमेरिकेत नवजात बालकांच्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास ट्रम्प यांची विनंती
अमेरिकेत जन्म झाल्यामुळे बालकांना मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास परवानगी देण्याची विनंती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, अमेरिकेत बेकायदेशीर रीत्या राहणाऱ्या लोकांच्या या वर्षीच्या 19 फेब्रुवारीनंतर जन्मलेल्या मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही, असा नियम ट्रम्प प्रशासनानं आणला आहे. हा नियम आतापर्यंत काही राज्यांनीच लागू केला आहे.