July 26, 2025 1:53 PM July 26, 2025 1:53 PM
55
‘न्यू स्टार्ट’ समझोता करारातल्या तरतुदी जपण्याला आपली पसंती -डोनाल्ड ट्रम्प
अण्वस्त्रकपातीसाठी रशियाबरोबर केलेल्या ‘न्यू स्टार्ट’ समझोता करारातल्या तरतुदी जपण्याला आपली पसंती असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. स्कॉटलंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या कराराच्या दिशेने काम करायला आपण सुरुवात करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. अमेरिका आणि रशिया यांच्यात २०१० मधे झालेल्या ‘न्यू स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी’, म्हणजेच ‘न्यू स्टार्ट’ करारानुसार या बलाढ्य अण्वस्त्रधारी देशांनी अण्वस्त्र आणि व...