November 21, 2025 6:59 PM November 21, 2025 6:59 PM

views 58

धुळ्यात नगराध्यक्षांसह सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड

धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी, तसंच भाजपाच्या काही नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित भाजपा उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही आज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागं घेतले.    अमरावती जिल्...

November 3, 2025 7:22 PM November 3, 2025 7:22 PM

views 230

धुळे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

धुळे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं माजी आमदार फारूक शाह यांनी आज जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक आज धुळे इथं झाली. यात महानगरपालिकेच्या सर्व ७४ जागा लढवण्याचा निर्णय झाला. महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. 

July 29, 2025 2:46 PM July 29, 2025 2:46 PM

views 9

धुळ्यात एसटी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू , २२  जण जखमी

महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरच्या दभाषी फाटा येथे आज सकाळी एका एसटी बसला झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून २२  जण जखमी झाले. शिरपूरला हून शिंदखेडा जाणाऱ्या या एसटीला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना शिरपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातल्या ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना धुळे इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

June 2, 2025 3:08 PM June 2, 2025 3:08 PM

views 23

धुळ्यात कपाशीचं बनावट बियाणं जप्त

धुळे कृषी विभागाच्या पथकाने धुळे शहरात आज सकाळी खाजगी बसेस आणि वाहनांवर छापे टाकून २० लाख रुपये किमतीचं कपाशीचं बनावट आणि राज्यात प्रतिबंध असलेलं बियाणं जप्त केलं आहे. पथकातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त घालताना मिळालेल्या माहितीच्या आधाराने वेष बदलून ही कारवाई तडीस नेली. हे बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलं जात होतं आणि त्यात बाराशे ते तेराशे पाकिटांचा समावेश होता . 

May 29, 2025 8:23 PM May 29, 2025 8:23 PM

views 13

धुळे प्रशासनाने रोखला बालविवाह

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात पिंजारझाडी इथे होत असलेला बालविवाह प्रशासनाने रोखला.  अनुक्रमे २० आणि १६ वर्ष वयाच्या बालक आणि बालिकेचा विवाह थांबवण्यासाठी चाईल़्ड हेल्पलाईन  टीमने साक्री पोलिसांच्या मदतीने  कारवाई केली. यावेळी पालकांकडून हमीपत्रे लिहून घेण्यात आली.

May 2, 2025 8:27 PM May 2, 2025 8:27 PM

views 21

धुळ्यात ७० लाख रुपयांचा गांजा जप्त

धुळे जिल्ह्यात ७० लाखांचा गांजा पोलिसांनी पकडला आहे. शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारातील जंगलात पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.  यात २५ किलोच्या एकुण ४० आणि  एक दहा किलोची एक गोणी अशा एकुण ४१ गोण्या असा एकुण १ हजार १० किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

April 23, 2025 6:02 PM April 23, 2025 6:02 PM

views 7

धुळे जिल्ह्यात १४ लाख रुपयांची वीज चोरी करणाऱ्या हॉटेलमालकावर गुन्हा दाखल

महावितरणच्या धुळे मंडळ कार्यालयानं केलेल्या कारवाईत एका हॉटेलनं १४ लाख रुपयांची वीज चोरी केल्याचं उघड झालं. त्यानंतर या हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय धुळे शहर परिसरात अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये औद्योगिक, व्यापारी वीज चोरी होत असल्याची अनेक प्रकरणही आढळून आली.   १६ दक्षता विभागातील भरारी पथकांच्या सहाय्यानं महावितरणनं ही कारवाई केली. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महाव...

April 2, 2025 8:02 PM April 2, 2025 8:02 PM

views 12

धुळ्यात बेकायदेशीर गांजा लागवडीवर कारवाई

महसूल गुप्तचर संचालनालयानं धुळे जिल्ह्यातल्या  बेकायदेशीर गांजा लागवडीवर कारवाई केली आहे. खामखेडा आंबे आणि रोहिणी गावात गांजाची लागवड होत असल्याची खबर कळताच ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ९ एकरांहून अधिक जमिनीवर सात वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणांहून गांजाची ९६ हजार ४९ झाडं जप्त करण्यात आली.

April 2, 2025 3:53 PM April 2, 2025 3:53 PM

views 11

धुळे तालुक्यात लागलेल्या आगीत म्हशीच्या 7 रेडक्यांचा मृत्यू

धुळे तालुक्यात आनंद खेडा गावामध्ये एका गोठ्याला मध्यरात्री लागलेल्या आगीत म्हशीच्या सात रेडक्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर दहा म्हशींना गंभीर दुखापत झाली. जिल्हा परिषद सदस्य तसंच जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

March 8, 2025 3:27 PM March 8, 2025 3:27 PM

views 16

२१ महिला पोलीस अंमलदारांना धुळ्यात कॉप ऑफ द मंथ पुरस्कार

जागतिक महिला दिन राज्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्‍या २१ महिला पोलीस अंमलदारांना कॉप ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. परभणी जिल्ह्यात दैठणा इथल्या  जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर गोंदियात सायकल संडे ग्रुपच्या महिलांनी शहरात सायकल रॅली काढली. या सायकल रॅलीत गृह पोलीस अधीक्षक आणि उप विभागीय महिला पोलीस अधिकारी तसंच तरुणींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. अकोला शहरात वॉकेथॉनद्वारे महिला सक्षमीकरणा...