धुळे जिल्ह्यात ७० लाखांचा गांजा पोलिसांनी पकडला आहे. शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारातील जंगलात पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. यात २५ किलोच्या एकुण ४० आणि एक दहा किलोची एक गोणी अशा एकुण ४१ गोण्या असा एकुण १ हजार १० किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
Site Admin | May 2, 2025 8:27 PM | Dhule
धुळ्यात ७० लाख रुपयांचा गांजा जप्त
