January 21, 2025 8:44 AM

views 31

धाराशिवमध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी २७ जानेवारीपासून जिल्हाभरात दोन आठवड्याचं शिबिर घ्यावं, असं त्यांनी सांगितलं.

December 18, 2024 8:35 AM

views 24

धाराशिवमध्ये ‘नई चेतना’ अभियानांतर्गत ‘लिंगभेद समानता’ विषयावर जनजागृती

धाराशिव जिल्ह्यात केंद्र सरकारच्या ‘नई चेतना’ या अभियानाअंतर्गत ‘लिंगभेद समानता’ या विषयावर जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये मुलगा मुलगी एक समान, बालविवाह प्रतिबंध करणे, महिलाविषयक अन्याय अत्याचार हिंसाचार यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शन, तसेच हुंडाबंदी, बालविवाह बंदी या सामाजिक विषयावरही जनजागृती केली जात आहे.

September 4, 2024 3:40 PM

views 22

धारशिव इथं प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन

प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन आज धारशिव इथं झालं. या मोहिमेत ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.   १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवडक व्यक्तींचाही लसीकरणात समावेश असेल. त्यात गेल्या पाच वर्षात उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, क्षय रुग्णांच्या सहवासातल्या व्यक्ती, कुपोषित, मधुमेही आणि धूम्रपान करणारे अशा व्यक्तींना त्यांची संमती घेऊन लस देण्यात येणार आहे.

August 28, 2024 3:41 PM

views 28

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात अनेक लोक सहभाग झाले होते. शहरातल्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. बांगलादेशातले अत्याचार थांबावेत यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली त्या संदर्भातही मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिलं.

August 20, 2024 8:33 AM

views 19

धाराशिव जिल्ह्यात ५ ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय

राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला पाच लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. इच्छुकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन प्राचार्य जटनुरे यांनी केलं आहे.

August 17, 2024 10:10 AM

views 16

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी सुमारे आठ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड वर्ग

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची मोकळी जागा वर्ग करण्यात आली आहे. धाराशिवच्या तहसीलदारांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे या ८ हेक्टर ३० गुंठे जागेचा ताबा सोपवल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. या जागेवर महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यासाठी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात आली आहे. त्याकरिता ५१३ कोटी रूपयांचा सुधारीत प्रस्ताव प्रशासकीय मान्यत...

August 13, 2024 8:57 AM

views 22

धाराशिवमध्ये क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या ७१ ग्रामपंचायतींचा गौरव

धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झालेल्या ७१ ग्राम पंचायतीचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल गौरव करण्यात आला. लातूर विभागात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकात धाराशिव जिल्हा आघाडीवर असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरदास यांनी आपल्या मार्गदर्शनातून टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने उपस्थित सरपंचांचे आभार व्यक्त केले. तसंच सर्व सरपंचांनी निक...

August 2, 2024 8:22 PM

views 28

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणातील हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला. जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल, तर सूचना आणि हरकती मागवल्या जातात. मात्र औरंगाबाद नामांतराच्या वेळी असं घडलं नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र, या प्रकरणी न्यायालयीन पुनरावलोकन करण्याची गरज नसल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालय...

July 23, 2024 7:40 PM

views 22

धाराशिवमध्ये भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृतीसाठी प्रदर्शन

भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीत ध्वनीचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रसरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेलं हे प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे. नागरिक, कायदेतज्ञ तसंच सामान्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नवीन कायद्यांची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकाऱ्यांनी केलं आहे.