November 27, 2025 6:46 PM

views 43

धाराशिव नगरपरिषदेतल्या ३ प्रभागांची निवडणूक स्थगित

धाराशिव नगरपरिषदेतल्या तीन प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. धाराशिव नगरपरिषदेतल्या प्रभाग २ अ, ७ ब आणि १४ ब या प्रभागांमधल्या काही उमेदवारांच्या अर्जावरचे आक्षेप न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं या प्रभागांची निवडणूक पुढच्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचं धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी सांगितलं.

November 22, 2025 3:20 PM

views 57

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार ८ जण जखमी

राज्यात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधे ८ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं काल रात्री एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीररीत्या जखमी झाले. नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेन...

August 7, 2025 3:36 PM

views 38

धाराशिवमध्ये सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी AI चा वापर

राज्यात सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने धाराशिव तालुक्यात उपळा इथे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रयोगांतर्गत १० शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र तर १० शेतकऱ्यांच्या शेतात एआय सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. या हवामान केंद्रांच्या २० किलोमीटर परिघातल्या शेतकऱ्यांना पाऊस, वातावरणातली आर्द्रता, उष्णता यांची निरीक्षणं एआयच्या माध्यमातून मिळणार आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं सुरू झालेला हा देशातला पहिला प्रकल्प आहे. या तंत्रज्ञानाच्या...

July 20, 2025 3:38 PM

views 31

नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटनाच्या दृष्टीने विकास प्रकल्प हाती घेणार – प्रताप सरनाईक

धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. पालकमंत्री सरनाईक यांनी आज २० जुलै रोजी नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली, आणि  सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.   पर्यटनाला चालना मिळावी,स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि इतिहासाची जपणूक व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार्याने विशेष योजना आखली जाणार आहे, असं सरनाईक यांनी यावेळी स...

June 24, 2025 3:22 PM

views 31

धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. यामधे गावांमधल्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचरा व्यवस्थापन, घनककचरा आणि सांडपाणी  व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक संकलन आणि त्याच्या व्यवस्थापनाचा समावेश आहे. 

June 18, 2025 11:09 AM

views 27

धाराशिव जिल्ह्यात ‘सॅटेलाईट स्किल सेंटर’ निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता

धाराशिव जिल्ह्यात ‘सॅटेलाईट स्किल सेंटर’ निर्माण करण्याच्या प्रस्तावाला पुण्याच्या सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठानं मान्यता दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या केंद्रामुळे युवकांसाठी उद्योगानुकूल प्रशिक्षण, जागतिक दर्जाचं कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.  

May 5, 2025 3:54 PM

views 65

वेव्हज परिषदेच्यानिमित्त धाराशीवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

मुंबईत नुकत्याच झालेल्या वेव्हज - २०२५ या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्तानं लोकसंस्कृती आणि लोककलेची सांगड घालण्यासाठी जिल्हास्तरावर विविध  कार्यक्रम होत आहेत. धाराशिव इथं सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  आणि आकाशवाणीचे वार्ताहर देविदास पाठक या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात सहभागी झाले होते.  

April 25, 2025 7:15 PM

views 43

धाराशिवमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत आयोजित ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’  हा  कार्यक्रम धाराशिवमधल्या  वाघोली  इथं साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमात जलसंवर्धनाचे महत्व, पाणी समस्येचं  गांभीर्य, त्यावरच्या  उपाययोजना याविषयी ग्रामस्थाना मार्गदर्शन करण्यात आलं.  ओढा आणि  नाल्यातील  गाळ काढणे, पाणी वापर, जलव्यवस्थापन तसेच पिक पद्धती, पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त जमीन याबाबत शेतकऱ्यासोबत चर्चा करण्यात आली.  

March 26, 2025 10:02 AM

views 34

धाराशिवमध्ये स्वस्त धान्य दुकानातून बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्याचा निर्णय

धाराशिव जिल्ह्यातल्या बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुढाकार घेतला आहे. आता लवकरच जिल्ह्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तू तसंच साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे बचतगटांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

January 27, 2025 3:30 PM

views 36

धाराशिवमध्ये २ फेब्रुवारीपासून १०वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

धाराशिव तालुक्यातील पळसप इथं दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमलेनाचं उद्धाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या साहित्य संमेलनात संविधानाच अमृत महोत्सव आणि मानवी मूल्ये या विषयावर परिसंवाद होणार  असून कथाकथन, कवी संमेलन होणार आहे.