July 12, 2025 7:43 PM July 12, 2025 7:43 PM

views 8

नवी मुंबई विमानतळाचं काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी या विमानतळाची पाहणी केली आणि आणि धावपट्टीपासून ते टर्मिनल इमारतीपर्यंतच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हा देशातला सगळ्यात अद्ययावत प्रकल्प ठरणार असून या विमानतळाचं ९४ टक्के काम पूर्ण झालं आहे. धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीचं कामही पूर्ण झालं आहे. आता आतल्या भागाचं काम सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.  &nbs...

July 5, 2025 7:30 PM July 5, 2025 7:30 PM

views 24

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्ता असताना ते काहीही करू शकले नाही. तरी त्यांना पुन्हा सत्ता हवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दोन्ही भावांना एकत्र आणल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

January 4, 2025 8:32 PM January 4, 2025 8:32 PM

views 15

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा  आढावा घेतला. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किलो मीटर  मेट्रो कार्यान्वित होतील, असं  नियोजन करण्याचे तसंच  सर्व मेट्रोमार्गांची  कामं  पूर्ण होण्याचं  वेळापत्रक नव्यानं  तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भविष्यातल्या सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी आतापासूनच कारशेडसाठी जागा आरक्षित करण्याची  सूचना त्यांनी केली.     इंदू मिल इथलं  भारतरत्न डॉ ब...

December 9, 2024 7:57 PM December 9, 2024 7:57 PM

views 9

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना आज सांगितलं. त्यांनी आज विधान भवनातल्या समिती सभागृहात या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातल्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेण्यासाठी अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा, असं ते म्हणाले. पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्या...

December 9, 2024 3:44 PM December 9, 2024 3:44 PM

views 12

राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता, तो सभागृहाने आवाजी मतदानानं मंजूर केला.   त्यानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित झालं असून आता सायंकाळी राज्यपालांच्या अभिभाषणाने कामकाज पुन्हा सुरू होईल. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आता व...

December 5, 2024 8:12 PM December 5, 2024 8:12 PM

views 16

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज शपथ घेतली. मुंबईत आझाद मैदानात झालेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडनवीस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.    यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, जेपी नड्डा, रामदास आठवल...

December 5, 2024 8:26 AM December 5, 2024 8:26 AM

views 113

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे. भाजपाच्या गाभा समितीच्या काल झालेल्या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्री...

December 4, 2024 8:18 PM December 4, 2024 8:18 PM

views 14

नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल – देवेंद्र फडणवीस

महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडनवीस, एकनाथ शिंदे  आणि अजित  पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. महायुतीत  आतापर्यंत सर्व निर्णय एकत्रितपणे घेतले गेले असून यापुढेही एकत्र राहून निर्णय घेऊ असं भाजपा विधिमंडळ गट नेते देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांगितलं.    महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उल्लेख करत फडनवीस यांनी जनतेचे तसंच भाजपा नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले य...

November 7, 2024 6:38 PM November 7, 2024 6:38 PM

views 14

‘अमरावतीत तयार होणाऱ्या टेक्सटाईल पार्कमुळे १० लाख नागरिकांना रोजगार मिळणार’

अमरावतीमध्ये उभारण्यात आलेल्या टेक्सटाईल पार्कमुळे ५० हजार लोकांना रोजगार मिळाला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत आणखी एक पार्क तयार करण्याची घोषणा केली असून त्यामुळे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पांढरकवडा इथं भाजपा उमेदवार राजू तोडसाम यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आमचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार असून त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले.   त्यानंतर ...

November 6, 2024 6:47 PM November 6, 2024 6:47 PM

views 12

राहुल गांधी काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून अतिडावे बनल्याची फडणवीसांची टिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून, अतिडावे बनल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीमध्‍ये बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या कव्‍हरमध्‍ये असते, मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगाचं कव्‍हर घातलेली का दाखवतात, असा प्रश्नही त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्‍या १८० संघटना विध्‍वंसक कृत्‍यात सहभागी असणाऱ्या होत्‍या, असा आरोप...