October 12, 2024 9:48 AM

views 47

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोत्तम तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण कमी होईल तसंच जनतेमधली सायबर हल्ल्याची भीती कमी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महा सायबर-महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उद्घाटन काल मुंबईत, फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांवरील त्वरीत कारवाईसाठीच्या 14407 या दूरध्वनी मदत क्रमांकाचा प्रारंभ या कार्यक्रमात करण्यात आला.   तंत्रज्ञान नेहमी बदलत राहतं, त्य...

September 10, 2024 6:32 PM

views 29

धुळ्यात ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमीपजून

धुळे जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या ५४ गावांना शेतीसाठी थेट पाणीपुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं भूमीपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. सहा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे प्रवास आणि वाहतुकीची सोय, तसंच सुलवाडे-जामफळ-कनोली जल प्रकल्पामुळे सिंचनाची सोय उपलब्ध होत असल्यानं राज्यातल्या औद्योगिक केंद्रांमधे भविष्यात धुळ्याचाही समावेश होईल, असा विश्वास फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

September 6, 2024 6:40 PM

views 42

परदेशी गुंतवणूकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी  असलेल्या महाराष्ट्रानं  चालू  आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे.  एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या  एकूण गुंतवणुकीच्या 52 पूर्णांक 46 शतांश टक्के म्हणजेच सुमारे 70 हजार 795 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे  ही माहिती दिली. इतर आठ राज्यांमधल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य स...

September 4, 2024 10:47 AM

views 40

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत प्रारंभ

ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचं माध्यम आहे. यामधल्या पारदर्शकतेमुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘ई-गव्हर्नन्स’ या विषयावरच्या २७व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते काल मुंबईत बोलत होते. ‘विकसित भारत-सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ ही या परिषदेची संकल्पना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ई-गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक अ...

August 15, 2024 6:43 PM

views 31

कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरजवळच्या कोराडी तालुका क्रीडा संकुल सुविधांचं लोकार्पण आणि हर घर तिरंगा अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळयात बोलत होते. कोराडीच्या या तालुका क्रीडा संकुलाचं वीरांगना राणी अवंतीबाई असं नामकरण या समारंभात करण्यात आलं.   या क्रीडासंकुलात बॉक्सींग, टेबल टेनीस, फेन्सींग, कुस्ती, जिम्नॉस्टिक, बॅलन्सींग बिम, ट्रायो ॲक्रोबॅटीक्स, रोमन रिंग, योगा आदी विविध प्रका...

August 10, 2024 7:14 PM

views 26

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी

महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पानंतर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १० पूर्णांक ६४ शतांश टीएमसी पाणी वापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातल्या ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. ७ हजार १५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टिने हे आणखी...

August 10, 2024 7:13 PM

views 13

नवीन कर प्रणालीबाबत लोकांना साक्षर करण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घेण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन

कर विषयक कायदे, आर्थिक जबाबदारी याविषयी जनसामान्यांना साक्षर करुन आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं.   'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय विदर्भ परिषदेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.  नव्या करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीतून महाराष्ट्राची आर्थिक घोडदौड सुरु आहे. वर्ष  २०२८-२९ पर्यंत ५०० ट्रिलियनची अर्थव्यवस्...

August 4, 2024 7:19 PM

views 35

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यासाठीचा १०० कोटींचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. श्रीक्षेत्र अरण तालुका माढा इथल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा आणि भक्तनिवास वास्तु...

July 30, 2024 7:44 PM

views 35

मराठवाड्यात खालसा झालेल्या देवस्थानच्या जमिनी मूळ मालकाला मिळणार

मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या देवस्थानच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या जमिनी मूळ मालकाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. मराठवाड्यात १३ हजार हेक्टरपेक्षा जास्त मदतमाश जमिनी अर्थात उपजिविकेसाठी प्रदान केलेल्या जमिनी आहेत. तर ४२ हेक्टरपेक्षा जास्त खिदमतपाश अर्थात सेवाधारी इनाम जमिनी आहेत.

July 23, 2024 6:34 PM

views 32

भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या घटकांना समोर ठेवून केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सिंचन, ग्रामीण रस्ते सुधार योजना, कृषी तसंच एमयुटीपी, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, दिल्ली मुंबई कॉरिडॉर अशा अनेक योजनांसाठी मिळणार असलेल्या निधीबद्दल सांगून फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात राज्यासाठी भरीव तरतूदी असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.