October 14, 2024 1:19 PM October 14, 2024 1:19 PM

views 13

दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी

मोठ्या प्रमाणात होणारं वायू प्रदूषम लक्षात घेता दिल्ली सरकारनं सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी आजपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत लागू असेल.   दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने हा आदेश जारी केला असून फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. हिवाळ्यात संभाव्य प्रदूषण लक्षात घेऊन ही बंदी घातल्याचं दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितलं. दिल्लीकरांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

October 11, 2024 1:48 PM October 11, 2024 1:48 PM

views 11

दिल्लीत दोन हजार कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन हजार कोटी रुपये किमतीचं २०० किलो कोकेन जप्त केलं आहे. पश्चिम दिल्लीतल्या रमेश नगर परिसरातून हे कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात ५०० किलो कोकेन जप्त केलं होतं. पोलिसांनी या सर्व प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे.

August 29, 2024 3:54 PM August 29, 2024 3:54 PM

views 21

दिल्लीत सकाळी भूकंपाचे धक्के

दिल्ली राजधानी क्षेत्रात आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता ५ पूर्णांक ७ दशांश इतकी नोंदली गेली. भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

July 30, 2024 8:45 PM July 30, 2024 8:45 PM

views 8

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, दिल्ली पोलीस आयुक्त आणि दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करावा असं यात म्हटलं आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतल्या कोंचिंग सेंटर्स आणि संस्थांची संख्या जाणून घेण्यासाठी दिल्लीच्या मुख्य सचिवांनी सखोल सर्वेक्षण करावं असं आयोगानं म्हटलं आहे.

July 30, 2024 9:19 AM July 30, 2024 9:19 AM

views 11

दिल्लीतील युपीएससीच्या तीन परीक्षार्थींच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समिती स्थापन

दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा एका कोचिंग वर्गात बुडून मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ही दुर्घटना घडण्या मागची कारणं, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, अशा गोष्टींची चौकशी ही समिती करणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करायचे उपाय आणि त्या अनुषंगानं धोरणातील बदलही समिती मार्फत सुचवण्यात येतील. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा हा मुद्दा काल संसदेच्या ...

July 6, 2024 10:10 AM July 6, 2024 10:10 AM

views 11

कम्युनिटी इनोव्हेटर फेलोच्या पदवीप्रदान सोहळ्यात स्टोरीज ऑफ चेंजच्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन

अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीने कम्युनिटी इनोव्हेटर फेलो च्या दुसऱ्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा काल नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ चेंज च्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. जगाला एक चांगलं स्थान बनवण्यासाठी आवश्यक असलेला बदल घडवून आणण्याच्या उत्कटतेने जगण्याचं धाडस करणार्‍यांसाठी हा उपक्रम आहे.   या प्रसंगी बोलतांना, AIM चे मिशन संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांनी शाश्वत विकासाच्या तत्त्वांना अनुसरून आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी आणि वित्तीय सेवा यांमधील उपाय...

June 21, 2024 11:35 AM June 21, 2024 11:35 AM

views 13

दिल्लीमध्ये उष्णतेची लाट !

दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात उष्माघातामुळे सफदरगंज रुग्णालयात ६ रुग्ण भरती झाले होते. त्यापैकी दोनरुग्णांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उष्णतेच्या त्रासाशीसंबंधित ४७ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल असून त्यापैकी २९ जणांची प्रकृती चिंताजनकआहे. १६ जूनपासून उष्णतेशी संबंधित आजारांमुळे ६२ रुग्ण दाखल झाले असून आजपर्यंत २४ जणांचामृत्यू झालं आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना उष्णतेची लाट येण्यापूर्वी यासंदर्भातप्रशिक्षण दिलं असल्याचं रुग्णालयानं सांगितलं.

June 19, 2024 8:38 PM June 19, 2024 8:38 PM

views 16

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं. अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली होती. या प्रकरणात माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण ३८ आरोपी आहेत.

June 13, 2024 8:59 PM June 13, 2024 8:59 PM

views 7

दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे अप्पर युमना नदी बोर्डाला निर्देश

दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज अप्पर यमुना नदी बोर्डाला दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली सरकारनं मानवतावादी दृष्टिकोनातून पाणीपुरवठ्याबाबत यमुना नदी बोर्डाकडे विनंती अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. हिमाचल प्रदेशनं आपल्या पूर्वीच्या भूमिकेपासून घुमजाव करून १३६ क्युसेक्स अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याचं सांगितल्यानं दिल्लीला पाणीप्रश्नाला सामोरं जावं लागत आहे, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.