January 24, 2025 1:21 PM January 24, 2025 1:21 PM

views 12

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराला वेग

येत्या ५ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून सर्व प्रमुख पक्षांचे नेते जाहीरसभा, रॅली, रोड शो आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहे.   उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, आज दिल्ली मतदारसंघात रॅली घेणार असून भाजपा नेते अनुरागसिंग ठाकूर, द्वारका, मंगोलपुरी आणि दिल्लीत विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत तर भाजपा नेत्या बांसुरी स्वराज शालिमार मतदारसंघातल्या मतदारांशी संवाद साधणार आहेत.   आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी म...

January 24, 2025 10:19 AM January 24, 2025 10:19 AM

views 16

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून नवी दिल्लीत

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू होणार आहे. उद्यापर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे. शिक्षण विभागानं संरक्षण विभागाच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. तेरा राज्यांमधले सोळा संघ अंतिम फेरीत सहभागी होत आहेत.

January 23, 2025 2:49 PM January 23, 2025 2:49 PM

views 13

नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन

भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन आजपासून केलं आहे. परिषदेच्या उद्घाटनाला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची उपस्थिती होती.   जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास ३० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे.   लोकशाही देशातील निवडणुकीचं भवितव्य हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर, राजकीय प्रचारात, निवडणूक का...

January 20, 2025 1:38 PM January 20, 2025 1:38 PM

views 8

दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

दाट धुक्यामुळे दिल्ली एनसीआर परिसरात दृश्यमानता कमी झाल्यानं अनेक रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या १९ गाड्या काही तास उशिरानं धावत असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. यात नौचंदी एक्स्प्रेस, अयोध्या एक्स्प्रेस, गरीब रथ, गोवा एक्स्प्रेस, पद्मावत एक्स्प्रेस आणि गोंडवाना एक्स्प्रेसचा समावेश आहे.

January 19, 2025 1:32 PM January 19, 2025 1:32 PM

views 14

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ४० उमेदवारी अर्ज वैध

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली, त्यात १ हजार ४० अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल होते. उद्याच्या दिवसात अर्ज मागे घेता येणार आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी अर्ज दाखल केला आहे. तर दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपच...

January 18, 2025 2:53 PM January 18, 2025 2:53 PM

views 10

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी १ हजार ५२१ उमेदवार अर्ज दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर येत्या २० जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.   नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २९ उमेदवारांचे सर्वाधिक ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे पर...

January 17, 2025 10:24 AM January 17, 2025 10:24 AM

views 13

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत एकंदर 841 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.   सोमवारी 20 तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

January 11, 2025 8:56 PM January 11, 2025 8:56 PM

views 12

गेल्या वर्षभरात १६ हजार ९१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गेल्या वर्षभरात १६ हजार ९१४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला यश मिळालं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरच्या परिषदेत बोलत होते. अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा मोहिमेचं तसंच मानस - दोन या हेल्पलाईन सेवेच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विस्ताराचं उद्घाटनही अमित शहा यांच्या हस्ते झालं. ही मोहीम येत्य...

January 11, 2025 10:55 AM January 11, 2025 10:55 AM

views 6

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना काल जारी झाल्याच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानीतल्या ७० जागांसाठी येत्या १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.   या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल संध्याकाळी दिल्ली पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह तसंच अन्य महत्त्वाचे पक्षनेते उपस्थित होते.

January 11, 2025 10:47 AM January 11, 2025 10:47 AM

views 17

दिल्लीत योगी आदित्यनाथ यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे प्रयागराज इथं संपन्न होत असलेला महाकुंभ मेळा शाश्वत अभिमानाचे प्रतीक ठरेल असं योगी यांनी भेटीनंतर लिहिलेल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यामधून नव्या भारताचे भव्य, दिव्य आणि डिजीटल स्वरुप दिसेल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रयागराज इथं १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी कालावधीत होतो आहे.