March 1, 2025 8:16 PM March 1, 2025 8:16 PM

views 29

दिल्लीत ३१ मार्चनंतर १५ वर्षांहून जुन्या वाहनांना पेट्रोल बंदी !

दिल्लीत ३१ मार्चनंतर १५ वर्षांहून जुन्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. अशी वाहनं शोधण्यासाठी पेट्रोल पंपावर विशेष उपकरणं लावली जात आहेत, अशी माहिती दिल्लीचे पर्यावरणमंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिली. राजधानीतली वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.  

March 1, 2025 11:20 AM March 1, 2025 11:20 AM

views 13

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळातील अहवाल उघड

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनावरील भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोविड काळात निधीचा कमी वापर, प्रकल्प अंमलबजावणीतील विलंब आणि शहरातील रुग्णालयांमध्ये औषधे आणि कर्मचाऱ्यांची कमतरता हे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहे.   मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत सादर केलेल्या अहवालात मागील सरकारनं कोविड काळात केंद्राकडून मिळालेल्या सुमारे 788 कोटींपैकी सुमारे 543 कोटी रु...

February 26, 2025 1:11 PM February 26, 2025 1:11 PM

views 15

दिल्लीच्या मद्य धोरणामुळे महसूल तोटा झाल्याचा कॅग अहवालात ठपका

दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारनं राबवलेल्या मद्य धोरणामुळे सरकारी तिजोरीतील २ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. नव्यानं स्थापन झालेल्या भाजपा सरकारने दिल्ली विधानसभेत काल कॅगचा अहवाल मांडला.  आप सरकारनं राबवलेल्या या धोरणात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.  मद्य धोरणामुळे आप सरकारवर टीकेची झोड उठली होती, यामुळे आम आदमी पार्टीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं सांगितलं जातं.

February 24, 2025 1:42 PM February 24, 2025 1:42 PM

views 29

महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू

‘शांतीरक्षक महिलाः विकसनशील राष्ट्रांचा दृष्टीकोन’ या विषयावरील महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत होत आहे. संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक केंद्राच्या सहकार्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत विकसनशील राष्ट्राच्या ३५ शांतीसेनेच्या तुकड्यांचा सहभाग असेल. परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचं बीजभाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कार्यविभागाचे महासचिव जीन पियरे लॅक्रोइक्स आणि संयुक्त राष्ट्र...

February 22, 2025 1:23 PM February 22, 2025 1:23 PM

views 19

‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा – शिवराज सिंग चौहान

‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. ‘पुसा-कृषी विज्ञान मेळा’ आज नवी दिल्ली इथं सुरु झाला.  या मेळ्याचं उदघाटन चौहान यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.     ‘उन्नत कृषी आणि विकसित भारत’ असं  या मेळ्याचं  उद्दिष्ट्य आहे. शेतकरी आणि शेतीशिवाय, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात सातत्यानं काम करत आहे, असं त...

February 21, 2025 9:30 AM February 21, 2025 9:30 AM

views 27

दिल्ली सरकार आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करणार

दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल संध्याकाळी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.   दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत योजनेसह पाच लाख रुपयांच्या निधीला एकमतानं मंजुरी दिली असून ती लवकरच लागू करण्यात येईल, असं ही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं. विधानसभेच्या पहिल्या बैठकीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगचे १४ अहवाल मांडले जातील अशी माहिती त्यांनी दिली.   तत्पूर्व...

February 15, 2025 10:14 AM February 15, 2025 10:14 AM

views 10

फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्लीत आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. या नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातलं पोलिस दल, तुरुंग, न्यायालयं, खटले आणि न्यायवैद्यकशास्त्राशी निगडीत नव्या विविध तरतुदींच्या अंमलबजावणी आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.   राज्यातल्या सर्व आयुक्तांलयांमध्ये शक्य तितक्या लवकर नवे फौजदारी कायदे लागू करण्याची सूचना केली. या बैठकीला राज्याच्या पोलिस महा...

February 9, 2025 1:31 PM February 9, 2025 1:31 PM

views 15

नवी दिल्लीत ५२व्या जागतिक पुस्तक मेळाव्याची आज सांगता

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरु असलेल्या ५२ व्या जागतिक पुस्तक मेळाव्याची आज सांगता होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मेळाव्याचं उदघाटन झालं होतं. शैक्षणिक पुस्तकांपासून आत्मचरित्र आणि कादंबऱ्या अशी विपुल साहित्य संपदा असलेला हा मेळावा राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेनं आयोजित केला आहे.   या पुस्तक मेळ्यात पुस्तकप्रेमींना एकाच ठिकाणी जगभरातलं विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध झालं. याशिवाय, लेखकांचं चर्चासत्रं, पुस्तकांचा लोकार्पण सोहळा, साहित्यिक सत्र...

February 9, 2025 1:02 PM February 9, 2025 1:02 PM

views 11

यमुना नदीकाठाचा विकास करण्याला आपल्या पक्षाचं प्राधान्य असेल – परवेश वर्मा

यमुना नदीकाठाचा विकास करण्याला आपल्या पक्षाचं प्राधान्य असेल, असं आश्वासन भाजपचे नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार परवेश वर्मा यांनी आज दिलं.   दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर परवेश वर्मा यांनी मुंडका या मूळ गावी जाऊन त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री साहेब सिंह वर्मा यांना आदरांजली वाहिली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. दिल्लीतल्या ग्रामीण भागाकडे राज्य सरकारनं प्रचंड दुर्लक्ष केल्याचा आरोपही वर्मा यांनी केला.

February 8, 2025 8:13 PM February 8, 2025 8:13 PM

views 13

दिल्लीत विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून समाधान व्यक्त

दिल्लीत आज विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असून ढोंग, अराजकता आणि संकटाचा पराभव झाला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झालं असून त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणाले. या निवडणुकीवेळी आपण प्रत्येक दिल्लीकराच्या नावे पत्र लिहून विनंती केली होती की दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्यासाठी संधी द्या...