May 28, 2025 8:01 PM May 28, 2025 8:01 PM

views 15

आंतर सेवा संघटना कायदा २०२३ अंतर्गत नवीन नियमांच्या अमंलबजावणीसाठी अधिसूचना जारी

देशाच्या सशस्त्र दलाची कार्यक्षमता,समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासाठी आंतर सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत नवीन नियमांच्या अमंलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे. हे पाऊल आंतर सेवा संघटनेची नियंत्रण व्यवस्था मजबूत करून सशस्त्र दलाची कार्यक्षमता आणि सुरक्षेवर भर देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आंतर सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ मध्ये कलम ११ अंतर्गत तयार केलेले नवीन अधिसूचित गौण नियमांचा उपयोग कायद्यात नमूद केलेल्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ह...

September 9, 2024 2:22 PM September 9, 2024 2:22 PM

views 15

संरक्षण विभागातर्फे तीन सेवांमधील अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रमाचं आयोजन

संरक्षण विभागानं आजपासून दिल्लीत तीन सेवांमधील अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रम आयोजित केला आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह तिन्ही दलांचे मेजर जनरल आणि समकक्ष अधिकाऱ्यांसाठी हा पाच दिवसीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात धोरणात्मक नियोजन, भविष्यातले धोके, आव्हानं आणि संघर्षांसाठी योग्य अंदाज आणि तयारी यांचा समावेश असेल. विविध विभांगांमधे समन्वय आणि एकात्मता वाढवणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.