November 3, 2025 3:37 PM November 3, 2025 3:37 PM
48
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल पंजाबमधल्या घुमान इथं संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या आणि गुरु गोविंदसिंहांचा पंजाब संतांचा आणि शूरांचा आहे. राजगुरू आणि भगतसिंहांचा क्रांतिकारी वारसा आपण जपतो. दोन्ही राज्यांमध्ये अतूट आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नातं आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.