April 10, 2025 2:42 PM

views 25

IPL: क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्समधे आजचा सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्स सलग तीन सामने जिंकत सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु चौथ्या स्थानी आहे.   दरम्यान कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, २१८ धावांचा पाठलाग क...

April 10, 2025 1:06 PM

views 32

अमेरिकेतील २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार

अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने काल याची घोषणा केली.   ऑलिंपिकमध्ये २० षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी १५ खेळाडू खेळवू शकणार आहे. मात्र, अद्याप यासाठी स्टेडियमच्या नावांची यादी ठरवण्यात आलेली नाही.

March 22, 2025 2:41 PM

views 22

१८व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून  असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण १० संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा १८वा हंगाम आहे.

March 8, 2025 3:10 PM

views 21

IPL : गुजरात जायंटस संघाचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून पराभव

महिला प्रीमियर लीग क्रिकेट मध्ये काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात गुजरात जायंटस संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १७८ धावांचं आव्हान गुजरात जायंटसनं ३ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं.  या विजयामुळे  गुजरात जायंट्स संघ ७ सामन्यांतून ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात ८ सामन्यातून मिळालेले १० गुण आहेत. या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे .

March 2, 2025 8:11 PM

views 25

विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी

विदर्भ क्रिकेट संघानं आज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केलं. नागपूर इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला अंतिम सामना आज अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली.  आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा झाल्या असताना, दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमती दर्शवली.   या सामन्यात पहिल्या डावात १५३, आणि दुसऱ्या डावात ७३ धावांची खेळी केलेल्या विदर्भच्या दानीश...

March 1, 2025 3:37 PM

views 32

ICC Champions Trophy : शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आमनेसामने

आयसीसी  करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडदरम्यान कराचीमधे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०७ पेक्षा जास्त धावांनी पराभव झाला, तर अफगाणिस्तानची वर्णी उपांत्य फेरीत लागू शकते. 

February 22, 2025 1:44 PM

views 16

WPL :- स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळूरू इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत झालेल्या तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर, यूपी वॉरियर्सनं अद्याप एकही सामना जिंकलेला नाही त्यामुळे ते पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असतील.   दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर ४ गडी राखून विजय मिळवला. पहिली फलंदाजी करताना बंगळु...

February 21, 2025 1:38 PM

views 22

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई पराभवाच्या छायेत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात विजयासाठी ४०६ धावांचा पाठलाग करताना, दुसऱ्या डावात मुंबईच्या ६ बाद २१० धावा झाल्या होत्या.   आज सामन्याच्या पाचव्या दिवशी मुंबईनं आपला दुसरा डाव कालच्या ३ बाद ८३ या धावसंख्येवरून पुढे सुरू केला मात्र शिवम दुबे, सुर्यकुमार यादव आणि आणि आकाश आनंद हे मुंबईचे फलंदाज झटपट माघारी परतले. त्यानंतर शम्स मुलानी आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतकी खेळी करत मुंबईचा डाव सावरल...

February 21, 2025 9:24 AM

views 21

ICC क्रिकेट : स्पर्धेत बांगलादेशवर मात करत भारताचा विजय

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशवर 6 गडी राखून मात करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली. बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २२९ धावांचं आव्हान ठेवलं; त्याला प्रत्युत्तर देताना ४७व्या षटकातच भारतीय संघानं विजय साकार केला. शुभमन गिलनं शतकी खेळी केली.   त्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रोहित शर्मानं 41 तर विराट कोहलीनं 22 धावा काढल्या. आज पाकिस्तानच्या कराची इथल्या मैदानावर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'ब' गटातील सामना होणार आहे.

February 19, 2025 8:34 PM

views 31

Ranji Trophy Cricket: विदर्भाची मुंबईवर २६० धावांची आघाडी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दुसऱ्या डावात आज दिवसअखेर ४ बाद १४७ धावा करत, मुंबईवर २६० धावांची आघाडी घेतली.    मुंबईचा पहिला डाव आज २७० धावांवर आटोपला. आकाश आनंदनं शतक झळकावत १०६ धावा केल्या. विदर्भातर्फे पार्थ रेखाडेनं ४ बळी घेतले. दुसऱ्या डावात, विदर्भाची सुरुवात खराब झाली. त्यांचे ४ गडी झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी डाव सावरला. आजचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड ५९, तर अक्षय वाडकर ३१ धावांवर ख...