June 13, 2025 10:11 AM

views 49

क्रिकेट – दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियाची 218 धावांची आघाडी

आयसीसी करंडक विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेतील लंडनमध्ये सुरू असलेल्या अंतिम सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियानं 218 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 8 गडी बाद 144 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, पहिल्या डावात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 138 धावांवर गारद झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा बळी घेतले होते.

June 12, 2025 1:12 PM

views 29

क्रिकेट:- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु

क्रिकेट कसोटी विश्वचषक स्पर्धेत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु आहे. काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांत आटोपला.   ब्यू वेबस्टरनं सर्वाधिक ७२ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेच्या कासिगो राबादानं पाच गडी बाद केले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ४ बाद ४३ धावा झाल्या होत्या. स्पर्धेतले भारताचे सामने येत्या २० जून पासून सुरु होणार आहेत.

June 3, 2025 8:13 PM

views 25

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना सुरू

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ८ व्या षटकात २ बाद ६७ धावा झाल्या होत्या. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आजतागायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे.

June 1, 2025 5:06 PM

views 40

कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकाच्या सामन्यांसाठी जूनपासून नवीन नियम लागू

कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकाच्या सामन्यांसाठी जून महिन्यापासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय़ आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतला आहे.  यात एकदिवसीय सामन्यांमधे नवीन चेंडूचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे.  सध्या एकदिवसीय सामन्यात प्रत्येक डावासाठी दोन नवीन चेंडू वापरले जातात. नव्या नियमानुसार ३४ षटकांपर्यंत दोन चेंडू वापरले जातील. त्यानंतर क्षेत्ररक्षण करणारा संघ डावाच्या शेवटी एक चेंडू निवडेल.

May 23, 2025 1:34 PM

views 26

IPL: आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघानं गुजरात टायटन्सवर ३३ धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघानं निर्धारित २० षटकांमध्ये २ गड्यांच्या मोबदल्यात २३५ धावा केल्या.   प्रत्युत्तरादाखल गुजरातच्या संघाला २०२ धावाच करता आल्या. लखनौकडून ११७ धावांची खेळी करणाऱ्या मिशेल मार्शला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असेल. लखनौमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू हो...

May 13, 2025 3:37 PM

views 29

IPL सामने पुन्हा रंगणार…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे १७ मे पासून पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकता नाईट रायडर्स संघांमध्ये बेंगळुरू इथं सामना होईल. तर ८ मे रोजी धरमशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये अर्ध्यावर सोडलेला सामना आता २४ मे रोजी जयपूरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ९ मे पासून आयपीएलचे उर्वर...

May 9, 2025 8:04 PM

views 32

महिला क्रिकेटमधे दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे तिरंगी एकदिवसीय मालिकेत, आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय मिळवला.    दक्षिण अफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१५ धावा केल्या. ॲनेरी डेर्क्सननं १०४, तर क्लोई ट्रायॉननं ७४ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे देवमी विहंगानं ५ बळी घेतले. विजयासाठी ३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४३ व्य़ा षटकातच २३९ धावांवर आटोपला.   चामरी अटापट्टुच्या ५१ आणि अनुष्का संजीवनीच्या नाबाद ४३ धावा वगळता श्रीलंकेच्या फलं...

April 28, 2025 1:01 PM

views 21

IPL: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत

आयपीएल क्रिकेटमध्ये आज जयपूरमधे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.   मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात  मुंबई इंडियन्स संघानं लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मात केली. मुंबई इंडियन्स संघानं ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघ १६१ धावाच करू शकला.   कालच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघानं दिलेलं १६३ धावांचं आव्हान रॉयल चॅलें...

April 25, 2025 3:00 PM

views 45

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान आजचा सामना

आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान होणार आहे.चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरु होईल.    बेंगळुरू इथे झालेल्या कालच्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा ११ धावांनी पराभव केला.

April 12, 2025 1:13 PM

views 25

IPL:- क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार असून संध्याकाळी सनराइजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ  आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.    दरम्यान, काल संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट  राईडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकात्यानं चेन्नईला सहज नमवत  विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई...