August 5, 2025 2:42 PM

views 32

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिका बरोबरीत सुटल्यामुळे भारत जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. काल झालेल्या या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. ५ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला. शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक हे दोघं मालिकावीर ठरले. या विजयामुळे भारताच्या खात्यात १२ गुणांची भर पडली असून भारत...

August 3, 2025 2:58 PM

views 47

भारत-इंग्लंड पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत

लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १ बाद ५० धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल.   भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. या मालिकेत इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी आहे.  

July 31, 2025 2:58 PM

views 44

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आजपासून ओव्हल मैदानावर

भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळं सध्या इंग्लडकडे २-१ अशी आघाडी आहे.   अंतिम सामन्यात विजय मिळवून  मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताला आहे. गेल्या चार सामन्यात एकदाही नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बाजूनं लागला नाही. या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे.  सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेतीन वाजता सुरु...

July 31, 2025 10:42 AM

views 44

भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द

भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंड्सच्या आयोजकांनी भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द केला आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका यामुळं भारतीय संघानं खेळातून माघार घेतली आणि काल आयोजकांना आपला निर्णय कळवला.

July 11, 2025 7:37 PM

views 33

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या पहिला डावात ३८७ धावा

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला. ज्यो रुटनं सर्वाधिक १०४ धावा केल्या. भारतातर्फे जसप्रित बुमराहनं ५, नितीश कुमार रेड्डी आणि महंमद सिराज यांनी प्रत्येकी २, तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला.

July 3, 2025 11:16 AM

views 31

जबॅस्टन इथं दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 310 धावा

एजबॅस्टन इथं दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारतानं इंग्लंडविरुद्ध पाच बाद 310 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 114 धावांसह आणि रवींद्र जडेजा 41 धावांसह खेळत आहेत.    जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन वेगवान गोलंदाज आकाश दीप पदार्पण करत आहे. शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही समावेश केला आहे.

June 29, 2025 3:40 PM

views 58

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काल इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव केला. क्रिकेटच्या या प्रकारात स्मृती मानधनाने कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकत तडाखेबंद ११२ धावा केल्या. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

June 23, 2025 5:56 PM

views 27

Anderson-Tendulkar Trophy : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची ९६ धावांची आघाडी

तेंडुलकर अँडरसन करंडक स्पर्धेच्या लीड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतानं ९६ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात २ गडी बाद ९० धावा केल्या. के एल राहुल ४७ आणि कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर खेळत होते. दुसऱ्या डावाचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी साडे तीन वाजता सुरू होणार आहे.

June 21, 2025 3:17 PM

views 25

तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेतील सामन्यात भारताची दमदार सुरुवात

इंग्लंडमधल्या हेडींग्ले इथं कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेला सुरुवात झाली. पाच सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या ३ बाद ३५९ धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के एल राहुल ४२ धावांवर तर कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. सलामीवीर यशस्वी जयस्वालनं १०१ धावा केल्या तर कर्णधार शुभमन गिल १२७ आणि उपकर्णधार ऋषभ पंत ६५ धावांवर खेळत आहेत.

June 20, 2025 8:15 PM

views 34

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांची दमदार सुरुवात

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषक पाच कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज इंग्लंडमधे लीड्स इथं  हेडिंग्ले मैदानावर सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.    भारताचा धावसंख्या ९१ झाली असताना के एल राहुल ४२ धावांवर बाद झाला, तर त्यानंतर आलेला साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. जैस्वालनं शतक, तर गिलनं अर्धशतक पूर्ण केलं आहे.  शेवटची बातमी हाती आल...