July 2, 2025 8:34 PM

views 17

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर झालेले मृत्यू यांचा परस्परसंबंध नसल्याचा ICMR चा निष्कर्ष

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाणात साईड इफेक्ट्स असल्याचं या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या काळात, वरकरणी निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींच्या अचानक झालेल्या मृत्युंबाबत केलेल्या संशोधनातून, ...

July 2, 2025 1:57 PM

views 9

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष-भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाणात साईड इफेक्ट्स असल्याचं या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या काळात, वरकरणी निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींच्या अचानक झालेल्या मृत्युंबाबत केलेल्या संशोधनातून, ...

June 3, 2025 3:23 PM

views 30

कोविड- १९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र राज्य सरकारनं कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या ५ टक्के रुग्णांची तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिले आहेत. हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेचं आरोग्य, खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहे...

March 7, 2025 12:57 PM

views 14

कोविड काळात धोरणात्मक नेतृत्वाबद्दल प्रधानमंत्री बार्बाडोस पुरस्काराने सन्मानित

कोविड महासाथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि महत्त्वाच्या मदतीसाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बार्बाडोस या कॅरिबियन राष्ट्राच्या प्रतिष्ठित मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. बार्बाडोसमध्ये ब्रिजटाऊन इथं झालेल्या समारंभात परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारेटा यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला.

July 20, 2024 7:56 PM

views 24

भारतात कोरोना महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन

भारतात २०२० मध्ये कोविड -१९ महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असून लेखकांच्या  कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. अहवालातील दाव्यात सुसंगती नसून अस्पष्टता आढळते. या अभ्यासातील निष्कर्ष आणि प्रस्थपित कोविड-१९ मृत्युप्रमाण प्रारूप, यात विसंगतीदेखील दिसते.  यामुळे हा अहवाल विश्वासार्ह ठरत नाही, असं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे.