May 14, 2025 7:42 PM May 14, 2025 7:42 PM
18
नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची काँग्रेसची मागणी
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. बी बियाणं उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे, मात्र सरकार त्यासाठी काहीच करत नाही असं सपकाळ म्हणाले. राज्यभर बोगस बियाणांचा सुळसुळाट झाला आहे, त्याचा बंदोबस्त सरकारने करावा अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवणं हे अत्यंत चुकीचं आहे, असंही सपकाळ म्हणाले.