काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक डोणगावकर यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येत त्यांनी राज्यात युती सरकार स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना त्यांनी नांदूर-मधमेश्वर कालव्याला चालना दिली. तसंच, नागपूर-मुंबई महामार्ग, गंगापुर-भेंडाळा रस्ता आणि घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना यांसारख्या प्रकल्पांना वेग दिला.
Site Admin | July 5, 2025 7:22 PM | Congress
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक डोणगावकर यांचं निधन
