July 6, 2025 7:30 PM

views 13

आपण ज्ञानेश्वर, शिवराय, सावित्रीमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारश्याचे वाहक असल्याचं मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन

आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वंशज नसलो, तरी विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. त्यात ते बोलत होते. या सर्वांनी आपल्या ज्ञानानं, त्यागानं आणि धैर्यानं हे राज्य घडवलं. त्याला जपणं, वाढवणं, आणि पुढं नेणं हे आपलं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरणरंजन नाही. आपण कोण आहोत, हे समजून घेऊन,...