August 18, 2024 10:00 AM August 18, 2024 10:00 AM

views 8

राज्यात कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाई मुळं परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

August 17, 2024 8:33 PM August 17, 2024 8:33 PM

views 10

लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराची आर्थिक तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी वर्षभराची आर्थिक तरतूद केलेली आहे. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून त्यांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी हस्तांतरणाची औपचारिक सुरुवात करण्यासाठी पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर ज...

August 17, 2024 3:36 PM August 17, 2024 3:36 PM

views 8

लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला पुण्यात औपचारिक प्रारंभ

राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम आज पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, तसंच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येत असून ...

August 17, 2024 10:20 AM August 17, 2024 10:20 AM

views 19

महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान-एनयुएलएम, महिला आर्थिक विकास महामंडळ-माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.   शहरांमध्ये बचतगटांची संख्...

August 16, 2024 8:50 PM August 16, 2024 8:50 PM

views 10

महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप तयार करावं. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

August 14, 2024 10:35 AM August 14, 2024 10:35 AM

views 7

लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातल्या विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

August 13, 2024 6:13 PM August 13, 2024 6:13 PM

views 12

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी

नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना करण्यासाठी २ हजार ७६६ कोटी रुपये खर्चाच्या एकूण १ हजार ९५० कामांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.  दरड - वीज कोसळणे, पूर, यापासून संरक्षणासाठी भिंत, पुलांचं बांधकाम, नाला खोलीकरण, या कामांचा यात समावेश आहे. मंत्रालयातलं राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी कक्ष या केंद्राशी जोडले जातील. तसंच प्रत...

August 13, 2024 10:15 AM August 13, 2024 10:15 AM

views 8

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं कावड यात्रेत संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातला नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वसामान्यांना लाभ देणाऱ्या विविध योजना या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीत, तर त्या कायमस्वरूपी चालणाऱ्या योजना असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. कळमनुरी तालु...

August 12, 2024 6:42 PM August 12, 2024 6:42 PM

views 11

पाणमांजर, गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता

पाणमांजर, गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. राज्य वन्य जीव मंडळाच्या आज मुंबईत झलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी पेंच इथं पाणमांजर, नाशिकमधे गिधाड, तर गडचिरोलीत रानम्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सातारा जिल्ह्यातल्या जावळीच्या जंगलात ५०० प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती असल्याचं सांगत, त्याठिकाणी संशोधन आणि विकास केंद्...

August 12, 2024 6:41 PM August 12, 2024 6:41 PM

views 7

जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात

मित्र अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट  फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या नियामक मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. यात राज्यात जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प तसंच कृष्णा भिमा खोऱ्यातली पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून १ हजार ५६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्...