August 29, 2024 7:14 PM

views 19

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्हात मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधण्यासाठी तसंच एकूणच या घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत बांधकाम अभियंते, आयआयटी मुंबईचे प्रतिनिधी, तसंच नौदलाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. याखेरीज राजकोटमधेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यासाठी देशातले नामवंत शिल्पकार, अभियंते, तज्ञ आणि नौदलाचे प्रतिनिधी यांची तज्ञ समिती ...

August 28, 2024 9:13 AM

views 17

‘लाडक्या बहिणी’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारी आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'लाडक्या बहिणी' प्रमाणेच 'सुरक्षित बहीण' ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असून, गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

August 24, 2024 7:13 PM

views 20

शेवटच्या महिलेचा अर्ज येईपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढच्या महिन्यात अर्ज सादर करणाऱ्यांनाही ३ महिन्याचे पैसे देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या योजनेमुळे चांद्यापासून बांद...

August 23, 2024 7:03 PM

views 28

बंदबाबत न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र, त्यावर होत असलेलं राजकारण त्याही पेक्षा दुर्दैवी आहे.  नेपाळमधल्या बस दुर्घटनेत जळगावमधल्या नागरीकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नेपाळमध्ये आमदार आणि अधिकारी पाठवून तातड...

August 23, 2024 6:56 PM

views 26

लाडकी बहीण योजनेसह सुरक्षित बहीण योजनाही राबवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहिण योजनाही राबवली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते नाशिकमधे  महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबीरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना चालू राहील, तसंच ऑगस्ट महिन्याची मुदत संपल्यानंतरही सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या बहिणींना देखील आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या...

August 22, 2024 3:02 PM

views 22

५ वर्षांत मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री

मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी, अर्थात स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षांत दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगानं लक्ष केंद्रित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी निती आयोगानं केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  निती आयोगानं केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराच्या विकासाचं उद्दिष्ट...

August 21, 2024 5:54 PM

views 53

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकनाथ शिंदे भूमिपूजन

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचं केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंद यांनी या वेळी केलं. परदेशी नागरिकांसाठीही हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन १०० कोटी रुपयांच्या या टर्मिनलचं भूमिपूजन आज संपन्न झाल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे ...

August 20, 2024 8:22 AM

views 23

१ कोटी ४ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट...

August 19, 2024 1:44 PM

views 22

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचत असल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचतो आहे, याचा आनंद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते वरळी इथं बोलत होते. खेळात स्पर्धा असावी, पण ती जीवघेणी असता कामा नये, असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. या खेळाला १०० वर्षांची परंपरा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ खेळला जातो आणि आता याचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आला आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं. प्रो गोविंदा लीग स्...

August 19, 2024 11:04 AM

views 20

सातारा जिल्ह्यात राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा जिल्हयात पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी या राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या गावात महावितरणच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर कृषीपंप योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.