September 5, 2024 7:06 PM September 5, 2024 7:06 PM
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या १०९ शिक्षकांचा गौरव
विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकांचं समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचं असून त्यांच्यात जग बदलण्याची ताकद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार विजेत्या शिक्षकांना आज मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये प्राथमिक विभागातले ३८ शिक्षक, माध्यमिक विभागातले ३९ शिक्षक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे...