April 25, 2025 7:19 PM
15
एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
नागरिकांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र आवश्यक असून, त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. ते आज मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये महापालिका, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, मेट्रो आदी यंत्रणांच्या माध्यमातून परिवहन सेवा सुरु आहेत. महानगरांमधल्या परिवहन सेवेच्या विकास आणि विस्तारासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करणं गरजेचं आहे. या प्राधिकरणाच्य...