May 9, 2025 8:08 PM May 9, 2025 8:08 PM

views 7

महत्त्वाच्या पदांवरच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे मॉक ड्रील करण्याचे तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातल्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.   युद्ध स्थितीत बचावासाठी करण्याच्या विविध हालचालींची माहिती आणि प्रशिक्षण नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ब्लॅकआऊटच्या वेळी विशेषतः रुग्णालयांबर...

May 7, 2025 3:51 PM May 7, 2025 3:51 PM

views 15

गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार

खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म विषयाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत गडचिरोलीचं गोंडवन विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचं कार्टीन विद्यापीठ यांच्यात आज यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. 

April 30, 2025 8:53 PM April 30, 2025 8:53 PM

views 11

जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला यामुळे मदत होईल, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे, असं त्यांनी म्हटलंय.    तर, केंद्र सरकारनं घेतलेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली...

April 29, 2025 3:24 PM April 29, 2025 3:24 PM

views 5

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.    राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण आणि रोजगारासाठी मदत करणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली

April 28, 2025 8:48 PM April 28, 2025 8:48 PM

views 11

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शासनाच्या सर्व सेवा येत्या १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत, ते आज मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात बोलत होते.     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या ज्या विभागाच्या सेवा १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दररोज प्रत्येक सेवेसाठी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल...

April 28, 2025 3:13 PM April 28, 2025 3:13 PM

views 17

सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात लोकसेवा हक्क अस्तित्वात आहे- मुख्यमंत्री

लोकशाही व्यवस्थेत सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अस्तित्वात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात हजारपेक्षा जास्त सेवा या कायद्यांतर्गत अधिसूचित केल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यातल्या बहुतेक सेवा या ऑनलाईन तत्वावरही राबवल्या जाणार आहेत. या संदर्भात मेटाशी संपर्क ...

April 27, 2025 1:35 PM April 27, 2025 1:35 PM

views 13

पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

April 25, 2025 7:19 PM April 25, 2025 7:19 PM

views 9

एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

नागरिकांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र आवश्यक असून, त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. ते आज मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.    सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये महापालिका, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, मेट्रो आदी यंत्रणांच्या माध्यमातून परिवहन सेवा सुरु आहेत. महानगरांमधल्या परिवहन सेवेच्या विकास आणि विस्तारासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करणं गरजेचं आहे. या प्राधिकरणाच्य...

April 25, 2025 7:25 PM April 25, 2025 7:25 PM

views 14

बेस्टनं स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतल्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी बेस्टनं  अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरवतानाच, स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिल्या. ते आज मुंबईत बेस्टच्या आढावा बैठकीत बोलत होते.    मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी तीन टक्के राखीव तरतूद केली तर याचा बेस्टला फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.    टोल माफ करावेत, कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी १ हजार ६५८ कोटी रुपये मिळावेत, सरकारी कर माफ करावा, अशा मागण्या बेस्टचे व...

April 23, 2025 7:45 PM April 23, 2025 7:45 PM

views 10

धर्मादाय रुग्णालयाच्या नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक

राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयाच्या नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली.   यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांवर केलेल्या उपचाराची माहिती, रुग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन भरावी, तसंच रुग्णालयात रुग्णांच्या य...