July 11, 2025 4:01 PM

views 31

राज्यभरातल्या ३ हजार तीनशेहून अधिक धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यभरातल्या एकंदर ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आत्तापर्यंत हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेदरम्यान दिली. मुंबईत १ हजार ६०० हून अधिक ठिकाणचे भोंगे हटवले आहेत.   ही कारवाई सामंजस्याने, धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता केल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. हटवलेले भोंगे पुन्हा लावले तर तिथल्या पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

July 8, 2025 3:04 PM

views 33

कायदा सुव्यवस्थेसाठी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथं हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकत होता म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.    दरम्यान...

July 8, 2025 3:29 PM

views 33

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० % वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातल्या अर्धशतक पार केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करायलाही मान्यता मिळाली आहे.   राज्यातल्या विद्यापीठं आणि अशासकीय महाविद्यालयांमधल्या रिक्त पदांची भरती, शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरती या मागण्यांनाही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे...

July 4, 2025 6:25 PM

views 18

भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं-मुख्यमंत्री

महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही. पण, भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.    पहिलीपासून हिंदीसक्तीचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळात झाला होता. आता त्याविरोधात विजयी मेळावा घेणं हा दुटप्पीपणा आहे. आपण या संदर्भात समिती स्थापन केली आहे. मराठी भाषक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आपलं सरकार घेईल, असंही फडणवीस यावेळी...

July 2, 2025 8:27 PM

views 27

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर 'मकोका' अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. असे गुन्हेगार एका राज्यात अटक होऊन जमीन मिळाल्यानंतर दुसऱ्या राज्यात जाऊन तिथे गुन्हे करतात, हे टाळण्यासाठी सर्व राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा गुन...

July 2, 2025 1:48 PM

views 26

महाराष्ट्रात वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य वाढवून देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचं आश्वासन

वीज कोसळून मृत्यू झालेले शेतकरी शेतमजूर यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता, आता तो करण्यात आला आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मदत निधी वाढवून देण्याबाबत सूचनांचा विचार करून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन महाजन यांनी दिलं. राज्यातल्या विविध विकास कामांमधे मेघा इंजिनियरिंग या कंपनीनं ३ हजार कोटींचा भ्...

June 29, 2025 8:45 PM

views 28

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ, ...

June 29, 2025 7:30 PM

views 129

त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं. विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आणि सरकारला एक पत्रही दिलं. मात्र विरोधकांकडे कोणतेही नवे मु...

June 27, 2025 9:52 AM

views 25

शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

एक महामार्ग अर्थव्यवस्थेची अनेक दालनं उघडी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केलं आहे. शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महामार्गाच्या प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर पाचशे ते एक हजार शेततळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

June 24, 2025 8:06 PM

views 108

राज्यात १ हजार ७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री

राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १ हजार ७१ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०’ अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. या प्रकल्पांमुळे राज्यातल्या ३ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ५ दशांश मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५ ते १० किलोमीटर परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे सौर ऊर्जा  प...