महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही. पण, भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
पहिलीपासून हिंदीसक्तीचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळात झाला होता. आता त्याविरोधात विजयी मेळावा घेणं हा दुटप्पीपणा आहे. आपण या संदर्भात समिती स्थापन केली आहे. मराठी भाषक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आपलं सरकार घेईल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.